advertisement

प्रवाशांनो लक्ष द्या! पुण्यातून कोकणात जाणारा 'हा' महत्त्वाचा घाट सव्वा महिना बंद; या पर्यायी मार्गांचा करा वापर

Last Updated:

एका बाजूला नीरा देवघर धरणाचे पाणी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर असल्याने कामादरम्यान वाहतूक वळवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही.

'वरंध घाट' रस्ता सव्वा महिन्यासाठी बंद (फाईल फोटो)
'वरंध घाट' रस्ता सव्वा महिन्यासाठी बंद (फाईल फोटो)
पुणे : पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा ऐतिहासिक 'वरंध घाट' रस्ता सव्वा महिन्यासाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग ९६५ डी.डी. वरील हिर्डोशी ते वरंधा दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशात सुरक्षेच्या कारणास्तव २५ मार्च २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत हा मार्ग बंद राहणार आहे.
वरंध घाट हा भाग दरडप्रवण असून येथे रस्ता अत्यंत अरुंद आणि धोकादायक वळणांचा आहे. एका बाजूला नीरा देवघर धरणाचे पाणी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर असल्याने कामादरम्यान वाहतूक वळवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. आगामी पावसाळा लक्षात घेता, घाटातील अवघड कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अधिकारी यांच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा रस्ता बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
advertisement
प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग कोणते?
घाटाचे काम सुरू असताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने पर्यायी मार्ग सुचवले आहेत. यात पुण्याकडे जाण्यासाठी: माणगाव - निजामपूर - ताम्हिणी घाट - मुळशी - पिरंगुट - पुणे. कोल्हापूर/सातारा बाजूकडे जाण्यासाठी: पोलादपूर - महाबेश्वर - वाई - सातारा किंवा पोलादपूर - खेड - चिपळूण - पाटण मार्गे जाता येणार आहे.
advertisement
स्थानिक ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन धामणदेव, हिर्डोशी, शिळीम यांसारख्या गावांच्या भागात आवश्यक तिथे मर्यादित स्वरूपात पर्यायी व्यवस्था केली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
प्रवाशांनो लक्ष द्या! पुण्यातून कोकणात जाणारा 'हा' महत्त्वाचा घाट सव्वा महिना बंद; या पर्यायी मार्गांचा करा वापर
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement