advertisement

Turmeric Rice : हैदराबादी बिर्याणीला टक्कर देतो हा चिंच भात! चवीला जबरदस्त अन् बनवायला सोपा..

Last Updated:
हैदराबादी बिर्याणीसोबतच चिंच भात हा देखील हैदराबादचा आणखी एक चविष्ट पदार्थ आहे. अनेक ठिकाणी याला 'पुलिहोरा' असं देखील म्हटलं जातं.
1/9
बिर्यांणी म्हटलं की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. त्यात हैदराबादी बिर्याणीचा तर नादच खुळा असतो. या शाही बिर्याणीने हैदराबादला देशभरात ओळख मिळवून दिली आहे. परंतु हैदराबादी बिर्याणीची ही चव केवळ मांसाहारी पदार्थांपुरती मर्यादित नाही. काही जुन्या आणि पारंपरिक पदार्थांमध्ये देखील अशीच चव आहे.

2/9
आजही अनेक स्वयंपाकघरांमध्ये असे अनेक पदार्थ बनवले जातात जे दिसायला साधे असले तरी चवीला मात्र दर्जेदार असतात. चिंच भात हा देखील हैदराबादचा असाच आणखी एक चविष्ट पदार्थ आहे. अनेक ठिकाणी याला 'पुलिहोरा' असं देखील म्हटलं जातं.

3/9
हा पदार्थ केवळ खाद्यसंस्कृतीचा एक भाग नाही तर स्थानिक थांद्यपरंपरेत देखील त्याची चव खोलवर रुजलेली आहे. सण असो किंवा रोजचे घरगुती जेवण चिंच भात आजही अनेक घरांमध्ये बनवला जातो. हा एक असा पदार्थ आहे जो एकदा खाल्ल्यावर त्याचा सुगंध आणि चव दोन्ही तुम्हाला आनंद देतात.

4/9
चिंच भाताचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची संतुलित चव असते. यात आंबट आणि तिखट चवींचा समतोल साधला जातो. हा बात बनवण्याची पद्धत देखील अगदी सोपी आहे. सर्वात आधी तांदूळ धुवून पूर्णपणे शिजवला जातो. त्यानंतर त्यात चिंचेचा घट्ट गर घातला जातो.

5/9
खरी चव फोडणीतून येते. मोहरी, जिरे आणि कढीपत्ता तेलात तडतडतात आणि त्यांचा सुगंध हवेत दरवळतो ते क्षण तर व्वा! असाच असतो. त्यात घातलेले कुरकुरीत शेंगदाणे त्याला एक विशिष्ट पोत देतात. सुक्या लाल आणि हिरव्या मिरच्या एक अनोखा तिखटपणा देतात. यामुळे तो आणखी खास बनतो.

6/9
चिंच भात त्याच्या चवीसाठीच तर प्रसिद्ध आहेच, परंतु तो आरोग्यासाठी देखील अतिशय फायदेशीर आहे. त्यात घातलेल्या चिंचेमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी पचनासाठी चांगले असतात. म्हणूनच तो पचायला हलका आणि सोपा मानला जातो.

7/9
आजही हैदराबादच्या जुन्या भागातील अनेक कुटुंबे त्यांच्या पारंपरिक पाककृतीनुसार चिंच भात बनवतात. धार्मिक कार्यक्रम आणि सणांच्या वेळी किंवा मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून त्याचे वाटप केले जाते. भंडाऱ्यात तर लोक मोठ्या भक्तीभावाने तो खातात.

8/9
या पदार्थाची लोकप्रियता एवढी वाढली आहे की तो आता शहरभरातील रेस्टॉरंट्स आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर सहज मिळतो. झटपट रेसिपी आणि जास्त काळ टिकण्याच्या त्याच्या क्षमतेमुळं तो प्रवासी आणि काम करणाऱ्या लोकांसाठी एक सोयीस्कर पर्याय ठरत आहे.

9/9
तुम्ही कधी हैदराबादला गेलात आणि तिथल्या अस्सल चवीचा अनुभव तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर इमली भात नक्की चाखून बघा. हा केवळ एक पदार्थ नाही, तर दक्षिण भारतीय संस्कृतीची एक झलक आहे. तो तुम्हाला अजिबात निराश करणार नाही.(Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.)

शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement