advertisement

उन्हाळ्यात 20 हजारांहून कमी बजेटमध्ये फ्रीज हवंय? Godrej, Whirlpoolसह 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन

Last Updated:

उन्हाळ्यात फ्रिजची खुप जास्त गरज असते. तुम्हीही या उन्हाळ्यात फ्रीज खरेदी करण्याचं प्लॅनिंग करताय? मग 20 हजार रुपयांहून कमी किंमतीत भारी फ्रिजची लिस्ट आपण पाहणार आहोत.

रेफ्रिजरेटर
रेफ्रिजरेटर
मुंबई : उन्हाळा सुरू झाल्यावर कुलर, एसीची जशी खुप जास्त गरज असते. तशीच फ्रिजही गरज असते. कारण या काळात अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते ते ठेवण्यासाठी फ्रीज लागतं. यासोबतच ज्यूस, पाणी गारेगार ठेवण्यासाठी फ्रीज आवश्यक असतं. तुम्हीही नवं फ्रिज खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि बजेट कमी असेल तर आज आपण काही बेस्ट ऑप्शन पाहूचा.
आज सिंगल डोर फ्रिजही अडव्हान्स फीचर्ससह येतात. यामध्ये 4 आणि 4 स्टार रेटिंग, इन्वर्टर टेक्नॉलॉजी आणि चांगली कूलिंग सिस्टम असते. हे वीज बचत करतात. यासोबतच जेवणही दीर्घकाळ ताजं ठेवतात.
Haier Fridge
तुम्हाला आणखी परवडणारा फ्रिज हवा असेल तर Haier चा 190 लिटर 5 स्टार फ्रिज 15,290 रुपयांत येतो. यात मजबूत ग्लास शेल्फ आणि फास्ट आइस मेकिंग टेक्नॉलॉजी मिळते. ज्यामुळे एक तासात बर्फ तयार होतो. हे छोट्या कुटुंबासाठी बेस्ट ऑप्शन आहे.
advertisement
Bosch Fridge
बॉशचं 226 लिटर 4 स्टार फ्रिज या लिस्टमध्ये सर्वात मोठ्या स्टोरेजसह येतो. याची खास गोष्ट म्हणजे हे पॉवर कटर दरम्यान 18 तासांपर्यंत कूलिंग टिकवून ठेवते. याची किंमत जवळपास 17,790 रुपये आहे.
advertisement
Voltas Beko Fridge
वोल्टासचा 208 लिटर 5 स्टार रेफ्रिजरेटरही या रेंजमध्ये शानदार फीचर्ससह येतो. यात फ्रेश बॉक्स टेक्नॉलॉजी, क्विक फ्रीज आणि चिलर झोनसारखे फीचर्स मिळतात. याची किंमत 16,990 रुपये आहे आणि हा थोडा जास्त स्पेस असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे.
Godrej Fridge 
तुम्हाला कमी बजेटमध्ये भारी फ्रीज घ्यायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. Godrej चं 194 लिटर 5 स्टार डायरेक्ट कूलरेफ्रिजरेटर एक बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये Hygiene+ Inverter Technology, Turbo Cooling  आणि Moisture Control सारखे फीचर्स मिळतात. जे अन्न ताजे ठेवते. याची किंमत 16,990 रुपये आहे. हे व्हॅल्यू फॉर मनी ठरतात.
advertisement
डिझाइन आणि लूक्स तुमच्यासाठी महत्त्वाचे असतील तर Whirlpool चा 192 लिटरचा Vitamagic PRO फ्रिज चांगला ऑप्शन आहे. यात Auto Defrost टेक्नॉलॉजी दिली गेलीये. जी बर्फ जमा होण्याची समस्या कमी करते. याची किंमत 17,490 रुपये आहे.या व्यतिरिक्त IFB आणि Sharp चे फ्रिजही या बजेटमध्ये चांगले फीचर्स आणि विश्वासार्ह परफॉर्मेंससह येतात. जे लहान कुटुंबासाठी योग्य आहेत.
advertisement
फ्रिज खरेदी करताना आपल्या गरजेनुसार कॅपेसिटी, स्टार रेटिंग आणि फीचर्स अवश्य चेक करा. लहान कुटुंबासाठी 175 ते 200 लिटरचं फ्रिज योग्य ठरतं. तुम्हाला वीज बचत करायची असेल तर 5 स्टार मॉडल निवडणं बेस्ट ठरतं. 20,000 रुपयांहून कमी किंमतीत तुम्हाला अनेक चांगले आणि विश्वासार्ह रेफ्रिजरेटर मिळतात. योग्य निवड करुन तुम्ही कमी बजेटमध्येही तुम्ही चांगली कूलिंग आणि दीर्घकाळ चालणारे फ्रीज खरेदी करू शकता.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
उन्हाळ्यात 20 हजारांहून कमी बजेटमध्ये फ्रीज हवंय? Godrej, Whirlpoolसह 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement