हा कसला लेक? पैशांसाठी आईच्या डोक्यात दगड अन्..., भयंकर कृत्यानं मुंबईत खळबळ
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Mumbai News: पैशांवरून वाद झाल्याने आईने लेकीला बोलावून घेतले. पण मुलाने दोघांनाही मारहाण केली.
मुंबई: खर्चासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मुलाने स्वतःच्या आईवरच दगडाने हल्ला केला. गोरेगाव पश्चिम येथून ही धक्कादायक घटना पुढे आली आहे. यामध्ये आई गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात राजपूत उर्फ विकास चावरिया याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार पूजा पवार या आपल्या पती विक्रम यांच्यासह जोगेश्वरी पश्चिम येथील नेपाळी चाळीत राहतात. त्यांची आई मुकेश्री सुखबीर चावरिया (वय 60) या गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे दोन मुलगे राजीव आणि विकास चावरिया तसेच पूजा यांचा 13 वर्षीय मुलगा ध्रुव राहतो.
advertisement
26 मार्च रोजी दुपारी सुमारे 12 वाजता आईने पूजा हिला फोन करून पैशांच्या कारणावरून विकास घरात वाद घालत असल्याचे सांगत तातडीने येण्यास सांगितले. पूजा तेथे पोहोचल्यावर त्यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र विकास संतापून त्याने पूजा आणि त्यांच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर त्याने दोघींनाही जीवे मारण्याची धमकी देत भीतीचे वातावरण निर्माण केले.
advertisement
वाद अधिक चिघळल्याने विकासने परिसरातील दगड उचलून आईच्या डोक्यावर विशेषतः उजव्या डोळ्याच्या वर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने ट्रॉमा केअर केंद्रात दाखल करण्यात आले जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पूजा यांनी विकासविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 9:52 AM IST








