advertisement

Mumbai Shocking : भयानक! संसार उभा करण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं; मिरा रोडच्या त्या घटनेने सर्वजन सुन्न

Last Updated:

Mira Road News : मुंबईतील मिरा रोड परिसरात घरकाम करणाऱ्या महिलेसोबत घडलेले धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.

News18
News18
मुंबई : मुंबईतील मिरा रोड येथील एका इमारतीत एका 37 वर्षीय महिलेची चाकूने हल्ला करत हत्या करण्यात आली आहे. ही महिला घरकाम करत असलेल्या ठिकाणी संपूर्ण घटना घडलेली आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून मिरा रोड पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.
मालकाच्या घरी पोहचताच सुमनसोबत भयंकर घडलं
मिळालेल्या माहितीनुसार, मिरा रोड येथे काही महिन्यांपासून घर काम करत असलेल्या सुमन कांबळे या काशिमिरा येथे वास्तव्यास आहे. नेहमीप्रमाणे सुमन या बुधवारी सायंकाळी कामासाठी गेल्या होत्या. त्यावेळी घरकाम करत असलेल्या घराच्या दरवाजातच त्या गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे शेजारी राहणाऱ्या महिलेने पाहिले. त्यांनी अन्य नागरिकांना बोलावून लगेच जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण त्यापूर्वीच सुमन यांचा मृत्यू झालेला होता.
advertisement
सुमन वर हल्ला झाला तेव्हा त्या घरात एकट्याच होत्या. पोलिसांच्या अंदाजानुसार सुमन या घरकाम करत असलेल्या ठिकाणी राहत असलेल्या एका व्यक्तीने पूर्वीच्या रागातून हा हल्ला केल्याचा संशय आहे. आता पोलिसांनी यानुसार तपास सुरु केला असून अज्ञात आरोपीविरोद्धात गुन्हा दाखल केलेला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Shocking : भयानक! संसार उभा करण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं; मिरा रोडच्या त्या घटनेने सर्वजन सुन्न
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement