advertisement

MS Dhoni : थाला फॅन्सला 'जोर का झटका', महेंद्रसिंग धोनी पहिले दोन आठवडे IPL 2026 मधून 'आऊट'

Last Updated:

MS Dhoni miss first two weeks of IPL 2026 : महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2026 चे पहिले दोन आठवडे मुकण्याची शक्यता आहे, असं चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी सांगितलं.

MS Dhoni miss first two weeks of IPL 2026
MS Dhoni miss first two weeks of IPL 2026
Mahendra singh Dhoni IPL 2026 : संजू सॅमसनच्या रुपात चांगला पर्याय मिळाल्यानंतर आता महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून आणि चेन्नई सुपर किंग्जमधून काढता पाय घेत असल्याचं हळूहळू समोर येत आहे. अशातच आता चेन्नईच्या ताफ्यातून मोठी बातमी समोर येत आहे. महेंद्रसिंग धोनी दोन आठवडे सामने खेळणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्याजागी संजू सॅमसन चेन्नईसाठी विकेटकीपिंग करेल. चेन्नई सुपर किंग्जने धोनीवर अधिकृतरित्या माहिती दिली आहे.

धोनी पहिले दोन आठवडे मुकण्याची शक्यता - चेन्नई सुपर किंग्ज

महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2026 चे पहिले दोन आठवडे मुकण्याची शक्यता आहे, असं चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी सांगितलं. "एम.एस. धोनी सध्या पोटरीच्या स्नायूंच्या दुखापतीवर पुनर्वसन उपचार घेत आहे. परिणामी, तो आयपीएल 2026 चे पहिले दोन आठवडे मुकण्याची शक्यता आहे," असं या फ्रँचायझीने सोशल मीडियावर सांगितलं आहे. सोमवारी होणाऱ्या आपल्या सलामीच्या सामन्यात चेन्नईचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.
advertisement
advertisement

चार सामन्यातून धोनी बाहेर

पहिल्या दोन आठवड्यांच्या कालावधीत, CSK चे सामने 30मार्च रोजी गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध, 3 एप्रिल रोजी चेन्नई येथे पंजाब किंग्सविरुद्ध, 5 एप्रिल रोजी बंगळुरू येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आणि 11 एप्रिल रोजी चेन्नई येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नियोजित आहेत. यानंतर, 14 एप्रिल रोजी चेन्नई येथे चेन्नईचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. धोनीचे पुनरागमन कदाचित दिल्लीविरुद्धच्या सामन्यात किंवा त्यानंतरच्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात होण्याची शक्यता आहे.
advertisement

यंदाचा हंगाम शेवट?

चेन्नई सुपर किंग्जला गेल्या काही वर्षात योग्य रिप्लेसमेंट खेळाडूची गरज भासत होती. मात्र आता संजू सॅमसनला 18 कोटीमध्ये खरेदी केल्यानंतर धोनी निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे. यंदाचा आयपीएल हंगाम त्याच्यासाठी शेवटचा असू शकतो. धोनी यंदाच्या हंगामात काही सामने खेळेल, अशी शक्यता देखील आहे. 44 वर्षांचा धोनी महत्त्वाच्या सामन्यात तरी खेळणार का? असा सवाल विचारला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MS Dhoni : थाला फॅन्सला 'जोर का झटका', महेंद्रसिंग धोनी पहिले दोन आठवडे IPL 2026 मधून 'आऊट'
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement