advertisement

Mumbai : गुड न्यूज! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह अवघ्या 5 मिनिटांत; असा असेल नवीन कनेक्टिव्हिटी मार्ग?

Last Updated:

Mumbai Traffic : मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारा ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. या मार्गामुळे प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होईल. तसेच दोन मुख्य मार्गांना थेट जोडणी मिळणार आहे.

ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह अवघ्या 5मिनिटांत
ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह अवघ्या 5मिनिटांत
मुंबई : मुंबई शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी अनेक प्रकल्प कार्यान्वित असून त्यातील एक प्रकल्प ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह. या प्रकल्पामुळे नेमकं किती अंतर कमी होणार याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मुंबईतील ट्रॅफिकचं टेन्शन मिटलं
मुंबईतील ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह बोगदा प्रकल्पाने सध्या महत्त्वाचा टप्पा गाठला असून आता या बोगद्याच्या मुख्य आणि अवघड टनलिंग ड्राइव्हच्या कामाला सुरुवात झालेली आहे. नंतर येत्या काही दिवसांतच 70 मीटरपर्यंत खोदकाम पूर्ण करुन वेगाने हे काम पुढे जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 3 डिसेंबर 2025 रोजी या टीबीएमचे लॉन्चिंग करण्यात आलेले होते. या प्रकल्पाच्या अंतर्गत येणारे अत्याधुनिक टीबीएम तंत्रज्ञानाचा वापर करुन दोन बोगदे उभारले जाणार आहे. तर यांची लांबी 7 किमी असेल. त्यापैंकी सध्या सुरु असलेला पहिला बोगदा हा 3.45 किमी लांबीचा असून त्याची खोली जमिनीच्या पृष्ठभागापासून तब्बल 52 मीटर असेल.
advertisement
प्रवासात किती मिनिटांची बचत होणार?
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह ते अतंर प्रवाशांना 5 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे, त्यामुळे पूर्व-पश्चिम प्रवास ही सोपा होईल. एवढेच नाही तर कोस्टल रोड आणि अटल सेतू या मार्गांना थेट जोडणी मिळणार आहे
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Mumbai : गुड न्यूज! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह अवघ्या 5 मिनिटांत; असा असेल नवीन कनेक्टिव्हिटी मार्ग?
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement