TRENDING:

निवृत्त होण्याची वेळ आलीय..., 1030 दिवसांपासून शतकच ठोकलं नाही, कोण आहे स्टार खेळाडू?

Last Updated:

टीम इंडीया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिका खेळते आहे.तर भारताचा कट्टर दुश्मन पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pak vs SA 2nd test babar azam : टीम इंडीया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिका खेळते आहे.तर भारताचा कट्टर दुश्मन पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळतो आहे. या मालिकेत पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम पुन्हा मोठी खेळी करण्यात फेल ठरला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षापासून बाबर आझम धावा काढण्यासाठी प्रचंड संघर्ष करतो आहे.त्यात त्याच्या बॅटीतून गेल्या तीन वर्षापासून एकही शतक आलं नाही आहे.त्यामुळे बाबर आझमच्या निवृत्तीची वेळ आली आहे,असे क्रिकेट वर्तुळात बोलले जात आहेत.
pak vs sa 2nd test
pak vs sa 2nd test
advertisement

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सोमवार (20 ऑक्टोबर) रावळपिंडी येथे सुरू झाला आहे. या सामन्यात पाकिस्तानने 38 वर्षीय आसिफ आफ्रिदीला पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी दिली.गेल्या 70 वर्षात तो संघासाठी कसोटी पदार्पण करणारा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात पाकिस्तान संघाचा दिग्गज फलंदाज बाबर आझम पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.अशाप्रकारे तो सलग सातव्या डावात अर्धशतक झळकावू शकला नाही.

advertisement

इमाम-उल-हक हा पहिल्या डावात बाद होणारा पहिला फलंदाज होता. त्याने 35 चेंडूत फक्त 17 धावा केल्या आणि सायमन हार्मरच्या गोलंदाजीवर काइल व्हेरेनने त्याला झेलबाद केले. तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार मसूद आला आणि अब्दुल्ला शफीकसोबत दुसऱ्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी केली. शफीक 146 चेंडूत 57 धावा करून बाद झाला, त्याने चार चौकार मारले. शफीकनंतर अनुभवी बाबर आझम क्रीजवर आला. संघाला त्याच्याकडून मोठ्या आशा होत्या.

advertisement

बाबर आझम अपयशी

बाबरने चांगली सुरुवात केली पण मोठी खेळी खेळण्यात तो अपयशी ठरला. त्याने 22 चेंडूत 16 धावा केल्या आणि केशव महाराजच्या चेंडूवर टोनी डी जॉर्जीने त्याला झेलबाद केले. बाबरने तीन चौकार मारले. तो मोठी खेळी करण्याच्या मार्गावर होता, परंतु डी जॉर्जीने एक शानदार झेल घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. बाबर सलग सात डावांमध्ये 50 धावा करू शकला नाही. गेल्या सात डावांमध्ये त्याचे गुण 16, 42, 23, 31, 1, 5 आणि 8 आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याने तीन वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात गाईचे तूप आरोग्यासाठी फायदेशीर, त्वचा राहील तजेलदार,आणखी हे फायदे पाहा
सर्व पहा

बाबरने 61 कसोटी सामन्यांमध्ये 111 डावांमध्ये नऊ शतके झळकावली आहेत. डिसेंबर 2022 मध्ये कराची येथे न्यूझीलंडविरुद्ध त्याची शेवटची धावसंख्या 161 होती. त्यानंतर त्याने एकही शतक झळकावले नाही.आता तो स्वस्त बाद झाल्यामुळे चाहत्यांना राग आला आणि त्यांनी सोशल मीडियावर त्यांचा राग काढला. काहींनी बाबरला निवृत्तीचा सल्ला दिला, तर काहींनी तो संघावर ओझे बनल्याची टीका केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
निवृत्त होण्याची वेळ आलीय..., 1030 दिवसांपासून शतकच ठोकलं नाही, कोण आहे स्टार खेळाडू?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल