Pakistan vs South Africa : पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिका या दोन संघात सध्या दुसरा टेस्ट सामना खेळवला जात आहे. या सामन्यात साऊथ आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने पाकिस्तानची भयानक धुलाई केली आहे. पाकिस्तानला स्वप्नात देखील वाटलं कगिसो रबाडा सारखा खेळाडू त्यांच्या गोलंदाजांना रडवून रडवून मारले.त्याचं झालं असं की साऊथ आफ्रिकेचे 235 धावांवर 8 विकेट पडले होते.त्यामुळे साऊथ आफ्रिका 250 धावात ऑलआऊट होईल असे वाटत होते. पण साऊथ आफ्रिकेच्या खालच्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी करून साऊथ आफ्रिकेचा डाव 400 पार नेला आहे. त्यामुळे पाकिस्तानची पु्न्हा नाचक्की झाली आहे.
advertisement
पाकिस्तानचा पहिला डाव हा 333 धावांवर ऑल आऊट झाला होता. त्यानंतर साऊथ आफ्रिकेच्या पहिल्या डावाची सूरूवात खूपच खराब झाली होती. कारण दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले होते. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि टोनी डे झोर्सीने आफ्रिकेचा डाव सावरला होता.स्टब्सने 76 आणि टोनीने 55 धावांची अर्धशतकीय खेळी करून हे दोघेही आऊट झाले होते. या दोन खेळाडूंच्या विकेटनंतर आफ्रिकेचा डाव गडगडला आणि झटपट विकेट पडले.
आफ्रिकेचे 235 धावांवर 8 विकेट पडले होते. आता इथून जास्तीत जास्त आफ्रिका 250 धावापर्यंत मजल मारून ऑलआऊट झाली असती असे वाटत होते.पण मैदानावर असलेल्या केशव महाराज आणि सेनुरन मुथूसामी टीचून फलंदाजी करत आफ्रिकेचा डाव 300 पार नेला होता. या दरम्यान केशव महाराज 30 धावांवर बाद झाला. महाराज बाद झाल्यानंतर रबाडा मैदानात आला होता. आता इथून जास्तीत जास्त 10 -12 धावा करून आफ्रिका ऑलआऊट झाली असत. पण रबाडाने उत्कृष्ट खेळी.
रबाडाने यावेळी 61 बॉलमध्ये 71 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 4 षटकार लगावले. तर त्याच्या सोबत मैदानावर असलेला सेनुरन मुथूसामी 89वर नाबाद राहिला.अशाप्रकारे साऊथ आफ्रिकेचा डाव 404 धावांवर ऑल आऊट झाला.यामुळे पहिल्या डावात 71 धावांची आघाडी घेतली होती.
पाकिस्तानची दुसऱ्या डावात आता खराब सुरूवात झाली आहे.कारण 94 डावात 4 विकेट पडले आहेत.सध्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान फलंदाजी करतायत.