TRENDING:

T20 World Cup 2024 : वर्ल्ड कप मॅचमध्ये पाकिस्तानवर बॉल टॅम्परिंगचा आरोप, ICC करणार कारवाई?

Last Updated:

अमेरिकेकडून पराभूत झाल्यावर पाकिस्तानच्या एका गोलंदाजावर बॉल टँपरिंगचा आरोप करण्यात येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये गुरुवारी 11 वा सामना अमेरिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये हरवून इतिहास रचला. पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये 19 धावांची आवश्यकता होती मात्र ते केवळ 13 धावांच करू शकले. अमेरिकेकडून पराभूत झाल्यावर पाकिस्तानच्या एका गोलंदाजावर बॉल टँपरिंगचा आरोप करण्यात येत आहे.
वर्ल्ड कप मॅचमध्ये पाकिस्तानवर बॉल टॅम्परिंगचा आरोप, ICC करणार कारवाई?
वर्ल्ड कप मॅचमध्ये पाकिस्तानवर बॉल टॅम्परिंगचा आरोप, ICC करणार कारवाई?
advertisement

अमेरिकेचा क्रिकेटर रस्टी थ्योरनने सोशल मीडियावर पोस्ट करून पाकिस्तानी गोलंदाजावर आरोप केले आहेत. रस्टी थ्योरनने सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिले, "ICC तुम्ही फक्त दिखावा करत आहात का की पाकिस्तान बदललेल्या नवीन बॉलशी कोणतीही छेडछाड करत नाही? आणि दोन ओव्हर आधीच बदलेल्या नव्या बॉलला रिव्हर्स करत आहेत? तुम्ही पाहू शकता की पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रऊफ आपल्या अंगठ्याच्या नख बॉलवर घासत आहे".

advertisement

अमेरिका विरुद्ध सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रऊफची बॉलिंग काही खास पडली नाही. त्याने 4 ओव्हर टाकले आणि त्यात एक विकेट घेऊन 37 धावा दिल्या. त्याने एंड्रीस गाउला आउट करून अमेरिकेची दुसरी विकेट मिळवली होती. हारिसने त्याला बोल्ड केले होते. सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स घेऊन 159 धावा केल्या होत्या. परंतु अमेरिकेने फलंदाजी करताना 159 धावा करून सामना टाय केला आणि मग दोन्ही संघांमध्ये सुपर ओव्हर खेळवण्यात आली ज्यात अमेरिकेचा विजय झाला.

advertisement

PAK vs USA: अमेरिकेला जिंकवण्यात किती 'भारतीय' खेळाडूंचा हात? सुपर ओव्हरमध्ये सुद्धा भारतीयाचीच कमाल

पाकिस्तानच्या वकार यूनुस, शोएब अख्‍तर आणि शाहिद आफ्रिदी सारख्या दिग्गज गोलंदाजांवर बॉल टॅम्परिंगचे आरोप लागले आहेत. वर्ष 2010 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना आफ्रिदीवर बॉल टॅम्परिंगचा आरोप करण्यात आला होता. बॉल दाताने चावून त्याचा आकार बिघडवताना पाहायला मिळाले होते. यामुळे आफ्रिदीवर दो टी20 सामन्यांचा बॅन लावण्यात आला होता.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup 2024 : वर्ल्ड कप मॅचमध्ये पाकिस्तानवर बॉल टॅम्परिंगचा आरोप, ICC करणार कारवाई?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल