पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा धक्कादायक निर्णय
होय, बरोबर ओळखलंत, मोहम्मद रिजवान याला कर्णधारपदावरून हटवून शाहिन शाह आफ्रिदीला पाकिस्तान क्रिकेट टीमचा नवा कॅप्टन बनवण्यात आलं आहे. पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिका यांच्यात रावळपिंडी येथे कसोटी क्रिकेट सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, 33 वर्षांचे रिजवान आणि 25 वर्षांचे शाहिन हे दोन्ही खेळाडू या मॅचमध्ये खेळत आहेत.
advertisement
शाहिन शाह आफ्रिदी पाकिस्तानचा नवा कॅप्टन
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शाहिन शाह आफ्रिदी याला कॅप्टन बनवण्याचं कोणतंही ठोस कारण दिलं नाही किंवा रिजवान यांना हटवण्याचंही कारण स्पष्ट केलं नाही. वाईट बॉल कोच माईक हेसन आणि सिलेक्शन कमिटी यांच्यात इस्लामाबादमध्ये झालेल्या मिटिंगमध्ये सर्व काही ठरले.
कारण काय?
पीसीबीने गेल्या आठवड्यात एक स्टेटमेंट जारी करून साऊथ आफ्रिका दौऱ्यापूर्वी मोहम्मद रिजवान याला कॅप्टन कायम ठेवण्यास स्पष्ट नकार दिला होता. याच कारणामुळे हेड कोच माईक हेसन यांनी पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याकडे नवीन कॅप्टनची नियुक्ती करण्यासाठी निवड आणि सल्लागार समितीसोबत बैठक बोलावण्याची विनंती केली होती.
पीसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, रिजवान यांना हटवण्यामागे हेड कोच माईक हेसन नाही, तर पीसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात आहे. तसं पाहिले तर कॅप्टन म्हणून शाहिन शाह आफ्रिदी याचा पूर्वीचा रेकॉर्ड खूप खराब होता. वर्ल्ड कप 2023 नंतर बाबर आझम याचा कॅप्टन्सीवरून काढलं गेलं आणि शाहिन शाह याला कमान सोपवण्यात आली होती.
सर्वात जास्त विकेट्स घेणारा बॉलर
शाहिन आफ्रिदी प्रथमच वनडेमध्ये कॅप्टन्सी करेल. त्याचे पहिलं मिशन साऊथ आफ्रिकाविरुद्धची वनडे सिरीज असेल. पुढील महिन्यात फैसलाबाद येथे तीन वन-डे मॅचेस खेळल्या जातील. आफ्रिदी हा गेल्या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी सर्वात जास्त विकेट्स घेणारा बॉलर होता. पाकिस्तान टी-20 टीमची कॅप्टन्सी सलमान अली आगा करतो. त्याला हटवण्यात बोर्डाने कोणताही रस दाखवला नाही.