पाकिस्तानच्या कॅप्टनच्या डोळ्यात पाणी
पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा यांनी मान्य केलं की, आशिया कप फायनलमध्ये टीम इंडियाकडून मिळालेला पराभव पचवणं त्यांच्यासाठी कठीण आहे. त्यांनी आपल्या बॉलरचे कौतुक केलं, पण अपेक्षेनुसार धावसंख्या उभारू न शकल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच सूर्याने ट्रॉफी घेण्यास नकार दिल्याने त्याने टीम इंडियावर टीका देखील केली आहे. नक्वी एसीसीचे अध्यक्ष आहेत म्हटल्यावर त्यांच्या हातूनच ट्रॉफी देणार ना...असं म्हणत सलमानने टीम इंडियावर टीका केली.
advertisement
काय म्हणाला सलमान अली आगा?
या पराभवाला पचवणं सोपं नाहीये. आम्ही बॅटिंग करताना विकेट्स गमावले. बॉलिंग चांगली झाली, परंतु रन अपुरे होते. आम्ही स्ट्राइक रोटेट करू शकलो नाही आणि त्यामुळे विकेट्स पडत राहिले. दुसरीकडे टीम इंडियाने ट्रॉफी घ्यायला हवी होती, असं म्हणत सलमान अली आगा याने टीम इंडियाला ज्ञान शिवकण्याचा प्रयत्न केला. तसेच पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये सलामानने चेक फेकून दिल्याचं देखील दिसून आलं.
पाहा Video
दरम्यान, 147 रन च्या टार्गेटचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळत झाली आणि 20 रन च्या आत 3 विकेट्स पडले. यानंतर तिलक वर्माने 53 बॉलमध्ये नाबाद 69 रन्सची महत्त्वपूर्ण इनिंग खेळली. त्याला संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी चांगली साथ दिली. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कोच गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील या टीमने सुरुवातीच्या दबावाला न जुमानता निर्भीड खेळ दाखवला आणि टायटलवर आपले नाव कोरलं आहे.