Suryakumar Yadav : क्रिकेटमध्ये राजकारण कशाला? पाकिस्तानी पत्रकाराला सूर्याचं एका वाक्यात उत्तर, पिकला हशा! पाहा Video

Last Updated:

Suryakumar Yadav Unique Reply to Pakistani journalist : तू पहिला कॅप्टन आहेस, ज्याने क्रिकेटमध्ये राजकारण घुसवलं, असं पाकिस्तानच्या पत्रकारने सूर्यावर आगपाखड केली. त्यावर सूर्याने हसला अन् उत्तर दिलं.

Suryakumar Yadav Unique Reply to Pakistani journalist
Suryakumar Yadav Unique Reply to Pakistani journalist
Suryakumar Yadav press conference : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील झालेल्या सामन्यात टीम इंडियाने 5 विकेट्स राखून विजय मिळवला आहे. आशिया कपमध्ये पहिलाच बॉल खेळत रिंकू सिंग याने विजयी चौकार मारला अन् आशिया कपवर टीम इंडियाचं नाव कोरलं. यानंतर मात्र मोठा राडा झाला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी टीम इंडियाला ट्रॉफी दिली नाही. त्यानंतर पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव याने खणखणीत प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानी पत्रकाराच्या एका प्रश्नाला सूर्याने सिक्स मारला.

नेमकं काय झालं?

आपण चांगला खेळ दाखवला. चॅम्पियन झालात, पण प्रश्न असा आहे की, संपूर्ण टुर्नामेंटमध्ये तूझी पाकिस्तान संघासोबत वागणूक होती... तू हँडशेक केला नाही. आशिया कपच्या फायनलआधी ट्रॉफीसाठी फोटोशूट केलं नाही. त्यानंतर तू एक राजकीय प्रेस कॉन्फरेन्स केली. तू पहिला कॅप्टन आहेस, ज्याने क्रिकेटमध्ये राजकारण घुसवलं, असं पाकिस्तानच्या पत्रकारने सूर्यावर आगपाखड केली. त्यावर सूर्याने हसला अन् उत्तर दिलं.
advertisement

पत्रकार परिषदेत सूर्याने पिकवला हशा

तुम्हाला उत्तर देऊ की नको... तुम्हाला आता राग येतोय, असं म्हणताच सूर्यासह संपूर्ण पत्रकार परिषदेत हशा पिकला. तुमचा प्रश्न कळालाच नाही, तुम्ही चार प्रश्न विचारून घेतले असं म्हण सूर्याने प्रश्नाला बगल दिली. पाकिस्तानच्या दुसऱ्या पत्रकाराने त्यानंतर सूर्याला घेरण्यासाठी थेट त्याच्या फॉर्मवर प्रश्न विचारला.
advertisement

मी आऊट ऑफ फॉर्म नाहीये तर...

आशिया कपमध्ये तुमच्या बॅटमधून रन्स निघत नाहीयेत. टीम इंडियाचा स्किपर आऊट ऑफ फॉर्म आहे, असं म्हणत पाकिस्तानच्या पत्रकाराने सूर्याला घेरलं. त्यावर सूर्याने सिक्स मारला. मी आऊट ऑफ फॉर्म नाहीये तर मी आऊट ऑफ रन्स आहे. सराव केल्याने सगळं काही ठीक होतं. तुम्ही सराव करत राहिला पाहिजे, असं म्हणत सूर्यकुमार यादवने आणखी एक खणखणीत उत्तर दिलं.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : क्रिकेटमध्ये राजकारण कशाला? पाकिस्तानी पत्रकाराला सूर्याचं एका वाक्यात उत्तर, पिकला हशा! पाहा Video
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement