देश भीकेला लागला, पाकिस्तान क्रिकेट बोर्डही होणार बरबाद, BCCI घेणार मोठी ॲक्शन
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
आशिया कप स्विकारण्यावरून झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर आता बीसीसीआय पाकिस्तान बोर्डावर मोठी ॲक्शन घेण्याच्या तयारीत आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिली.
२०२५ च्या आशिया कप स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानला हरवले. लीग स्टेज आणि सुपर ४ मध्ये पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर अंतिम सामन्यातही टीम इंडियाने पाकला धूळ चारली आहे. फायनल सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. संतापलेल्या नक्वी यांनी आशिया चषक ट्रॉफी त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये नेली. या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर आता बीसीसीआय पाकिस्तान बोर्डावर मोठी ॲक्शन घेण्याच्या तयारीत आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक फायनलपूर्वी सर्व काही निश्चित झालं होतं. भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवलं तर ते पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही, असं आधीच सांगण्यात आलं होतं. हे सर्व माहित असूनही, नक्वी अपमानित होण्यासाठी दुबईला गेले. अंतिम सामना जिंकल्यानंतर जेव्हा भारतीय खेळाडू ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आले नाहीत, तेव्हा नक्वी संतापले. ते ट्रॉफी घेऊन आपल्या हॉटेलमध्ये गेले.
advertisement
नक्वी यांनी मोठी चूक केली
भारतीय संघ चॅम्पियन बनला आणि ट्रॉफीसाठी पात्र आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आशिया कप आयोजित करत नाही; त्याची जबाबदारी पूर्णपणे आशियाई क्रिकेट परिषदेची आहे. ही ट्रॉफी पाकिस्तान बोर्डाची मालमत्ता नाही, जी नक्वी सोबत घेऊन गेले. ती कोणाकडून घ्यायची हे भारतीय खेळाडू आणि बीसीसीआयने ठरवले. आशिया कप चॅम्पियन म्हणून, भारतीय संघाला ट्रॉफी मिळेल आणि ते कोणीही थांबवू शकत नाही.
advertisement
मोहसिन नक्वीच्या कृतीला भारतीय क्रिकेट बोर्डाने माफ न करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रॉफी घेऊन हॉटेलमधून पळून गेल्यानंतर बीसीसीआय आयसीसीकडे तीव्र तक्रार दाखल करेल, अशी अपेक्षा आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांच्या खेळाडूंना आयसीसीने इशारा दिला होता की त्यांच्या कृती आणि हावभाव क्रिकेटच्या मैदानावर खिलाडू वृत्तीच्या विरोधात मानलं जाऊ शकतं. अशा पक्षपाती वर्तनानंतर, भविष्यात नक्वीच्या कोणत्याही वरिष्ठ पदावर राहण्याच्या क्षमतेबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो. भविष्यात त्याला कोणत्याही बोर्ड पदावर राहण्यापासून बंदी घातली जाऊ शकते. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच रसातळाला गेली असताना बीसीसीआय आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर कारवाई करण्याचा विचार करत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 8:41 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
देश भीकेला लागला, पाकिस्तान क्रिकेट बोर्डही होणार बरबाद, BCCI घेणार मोठी ॲक्शन