Salman Ali agha : टीम इंडियाने फायनल जिंकताच पाकिस्तानच्या कॅप्टनच्या डोळ्यात पाणी, पण प्रेस कॉन्फरेन्समध्ये दाखवला माज, पाहा Video

Last Updated:

Salman Ali agha in tears After loss : पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा यांनी मान्य केलं की, आशिया कप फायनलमध्ये टीम इंडियाकडून मिळालेला पराभव पचवणं त्यांच्यासाठी कठीण आहे

Salman Ali agha in tears After loss
Salman Ali agha in tears After loss
IND vs PAK, Asia Cup 2025 : टीम इंडियाने थरारक फायनलमध्ये पाकिस्तानला पाच विकेट्सने हरवून विक्रमी नवव्यांदा आशिया कपचे टायटल जिंकलं. भारताला शेवटच्या ओव्हरमध्ये 10 रन ची गरज होती. हारिस रऊफ बॉलिंग करत होता. तिलकने दुसऱ्या बॉलवर सिक्स मारला आणि चौथ्या बॉलवर रिंकू सिंगने फोर मारून भारताला विजय मिळवून दिला. रिंकूने विजयी शॉट मारताच पाकिस्तानच्या कॅप्टनच्या डोळ्यात पाणी आल्याचं पहायला मिळालं. पाकिस्तानचा कॅप्टन लालबुंद झाला होता. मात्र, प्रेस कॅन्फरेन्समध्ये सलमान अली आगाने हेकडी दाखवली.

पाकिस्तानच्या कॅप्टनच्या डोळ्यात पाणी

पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा यांनी मान्य केलं की, आशिया कप फायनलमध्ये टीम इंडियाकडून मिळालेला पराभव पचवणं त्यांच्यासाठी कठीण आहे. त्यांनी आपल्या बॉलरचे कौतुक केलं, पण अपेक्षेनुसार धावसंख्या उभारू न शकल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच सूर्याने ट्रॉफी घेण्यास नकार दिल्याने त्याने टीम इंडियावर टीका देखील केली आहे. नक्वी एसीसीचे अध्यक्ष आहेत म्हटल्यावर त्यांच्या हातूनच ट्रॉफी देणार ना...असं म्हणत सलमानने टीम इंडियावर टीका केली.
advertisement

काय म्हणाला सलमान अली आगा?

या पराभवाला पचवणं सोपं नाहीये. आम्ही बॅटिंग करताना विकेट्स गमावले. बॉलिंग चांगली झाली, परंतु रन अपुरे होते. आम्ही स्ट्राइक रोटेट करू शकलो नाही आणि त्यामुळे विकेट्स पडत राहिले. दुसरीकडे टीम इंडियाने ट्रॉफी घ्यायला हवी होती, असं म्हणत सलमान अली आगा याने टीम इंडियाला ज्ञान शिवकण्याचा प्रयत्न केला. तसेच पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये सलामानने चेक फेकून दिल्याचं देखील दिसून आलं.
advertisement

पाहा Video

advertisement
दरम्यान, 147 रन च्या टार्गेटचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळत झाली आणि 20 रन च्या आत 3 विकेट्स पडले. यानंतर तिलक वर्माने 53 बॉलमध्ये नाबाद 69 रन्सची महत्त्वपूर्ण इनिंग खेळली. त्याला संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी चांगली साथ दिली. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कोच गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील या टीमने सुरुवातीच्या दबावाला न जुमानता निर्भीड खेळ दाखवला आणि टायटलवर आपले नाव कोरलं आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Salman Ali agha : टीम इंडियाने फायनल जिंकताच पाकिस्तानच्या कॅप्टनच्या डोळ्यात पाणी, पण प्रेस कॉन्फरेन्समध्ये दाखवला माज, पाहा Video
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement