TRENDING:

Palak Muchhal On Smriti : 'धोनी'मुळे सुपरहिट, सलमानची फेवरेट सिंगर, स्मृती मानधनासोबत कसं आहे नातं?

Last Updated:

Palak Muchhal On Smriti Mandhana Relationship : माझ्या आयुष्यातील काही खास नात्यांपैकी स्मृती मानधना सोबतचे नाते मी जपते. ती एक खूप चांगली व्यक्ती आहे, असं पलक मुच्छल म्हणाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Palak Muchhal On Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार ओपनिंग बॅट्समन स्मृती मानधना आणि संगीतकार-दिग्दर्शक पलाश मुच्छल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. 2019 पासून डेटिंग करत असलेल्या या जोडीने जुलै 2024 मध्ये आपल्या नात्याला इंस्टाग्रामवर ऑफिशियल केले होते. आता खुद्द पलाश आणि त्याची बहीण, गायिका पलक मुच्छल यांनी त्यांच्या लग्नाचे संकेत दिले आहेत. शुभंकर मिश्रासोबतच्या पॉडकास्टमध्ये पलकने स्मृतीसोबतच्या नात्यावर खुलासा केला आहे.
Palak Muchhal On Smriti Mandhana Relationship
Palak Muchhal On Smriti Mandhana Relationship
advertisement

स्मृतीसोबत नातं किती घट्ट?

पलक मुच्छलने पत्रकार शुभंकर मिश्रा यांच्याशी बोलताना स्मृती मानधना सोबतचे तिचे नाते किती घट्ट आहे हे सांगितले. पलक म्हणाली, माझ्या आयुष्यातील काही खास नात्यांपैकी स्मृती मानधना सोबतचे नाते मी जपते. ती एक खूप चांगली व्यक्ती आहे. आम्ही दोघी खूर क्लोज आहे. सिस्टर सारखं नातं आमचं आहे, पण एक व्यक्ती म्हणून, वुमन म्हणून आणि आर्टिस्ट म्हणून मला तिचा खूप अभिमान वाटतो. तिने कमी वेळेत खूप काही मिळवलं आहे, असं म्हणत पलकने स्मृतीचं कौतूक देखील केलं.

advertisement

ती माझी बेस्ट फ्रेंड - पलक

स्मृती तिच्या क्रिकेट क्षेत्रात खूपच उत्कृष्ट आहे, कुटुंबवत्सल आहे आणि मूल्यांना जपणारी आहे. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, असं पलक म्हणाली. स्मृतीला संगीताची आवड आहे का, असा प्रश्न विचारला असता, पलकने "हो, नेहमीच. तिला संगीत खूप आवडते," असं म्हटलं. तिचे आवडते गाणं 'कौन तुझे' आहे, असंही पलकने सांगितलं.

advertisement

पाहा Video

वर्ल्ड कप 2025 मध्ये जबरदस्त पर्फॉर्मन्स

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कमी खर्चात होईल जास्त कमाई, हिवाळ्यात घ्या ही भाजीपाला पिके, Video
सर्व पहा

दरम्यान, स्मृती मानधनाची आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये जबरदस्त पर्फॉर्मन्स दिली आहे आणि ती सध्या अफलातून फॉर्ममध्ये आहे. तिच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. स्मृतीने न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये 95 बॉलमध्ये 109 धावांची सेंच्युरी ठोकत टीम इंडियाला मोठा टोटल उभा करून दिला. या वर्ल्ड कपमधील तिचे हे पहिले शतक ठरलं. वर्ल्ड कपच्या शेवटच्या तीन मॅचमध्ये तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 80 धावा, इंग्लंडविरुद्ध 88 धावा आणि न्यूझीलंडविरुद्ध 109 धावा असे सलग तीन मोठे स्कोर केले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Palak Muchhal On Smriti : 'धोनी'मुळे सुपरहिट, सलमानची फेवरेट सिंगर, स्मृती मानधनासोबत कसं आहे नातं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल