TRENDING:

Smriti Mandhana : सांगलीची स्मृति मंधाना होणार इंदूरची सून, नॅशनल क्रशच्या बायफ्रेंडची भर कार्यक्रमात लग्नाची कबुली

Last Updated:

स्मृती मंधानाच्या बॉयफ्रेंड चित्रपट संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलने इंदोरच्या एका कार्यक्रमात मोठी घोषणा करून टाकली आहे. पलाश मुच्छलने इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मंधानासोबत लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Smriti Mandhana Palash Muchhal : भारताची स्टार खेळाडू आणि सांगलीची लेक स्मृती मंधाना सध्या आयसीसी वुमेन्स वर्ल्डकपमध्ये व्यस्त आहे.या दरम्यानच्या स्मृती मंधानाच्या बॉयफ्रेंड चित्रपट संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलने इंदोरच्या एका कार्यक्रमात मोठी घोषणा करून टाकली आहे. पलाश मुच्छलने इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मंधानासोबत लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे.त्यामुळे आता सांगलीची लेक आता इंदूरची सून होणार आहे. पलाश मु्च्छलने या दरम्यान लग्नाची अद्याप तारीख सांगितली नाही आहे. त्यामुळे हे जोडपं आता कधी लग्न बंधनात अडकतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
palash muchhal smriti mandhana
palash muchhal smriti mandhana
advertisement

पलाश मुच्छल हा प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा भाऊ आहे. पलाश आणि स्मृती मंधाना गेल्या साधारण पाच वर्षापासून एकमेकांना डेट करतायत. या डेटींगनंतर आता दोघांनीही लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळेच आज स्टेट प्रेस क्लबच्या रुबरू कार्यक्रमात पलाश मुच्छलने स्मृती मंधानासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची घोषणा केली आहे.

पलाश मुच्छल यांचा लवकरच 'राजू बाजेवाला' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाबाबत माहिती देत असताना पलाश मुच्छलला त्याच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला होता. पलाशने लग्नाची घोषणा केली. त्याचसोबत कबूल केले की तो लवकरच महिला क्रिकेट संघाची स्टार स्मृती मानधनासोबत लग्न करणार आहे.

advertisement

या सिनेमाच्या शुटींगचे अनुभव सांगताना पलाश मुच्छल सांगतो,मला इंदूरमध्ये संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण करायचे होते. "राजू बाजेवाला" मध्ये इंदूरची सर्व प्रतिष्ठित ठिकाणे आणि रस्ते दाखवले जातील कारण मला इंदूर आवडते. मी येथे दहा वर्षांपासून राहतो आणि इंदूर माझ्या आत राहते,असे तो सांगतो.

इंदूरमध्ये चित्रपट निर्मितीसाठी तांत्रिक संसाधनांची कमतरता असली तरी, चांगल्या लोकेशन्सची कमतरता नाही आणि नागरिक इतके सहकार्य करतात की चित्रपट निर्मिती सहज शक्य आहे. इंदूरमध्ये एक प्रॉडक्शन हाऊस सुरू करण्याची योजना देखील आखत आहे,असे पलाशने यावेळी सांगितले.

advertisement

"राजू बँड वाला" हा चित्रपट बँड वादकांच्या जीवनावर, भावनांवर आणि चढ-उतारांवर आधारित आहे. या सिनेमात पंचायत फेम चंदन रॉय भूमिकेत दिसणार आहे.त्याच्यासोबत बालिका वधू मालिकेची स्टार कलाकार अविका गौर सिनेमात झळकणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिलमध्ये एका आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

स्मृती वर्ल्डकपमध्ये पाडतेय धावांचा पाऊस

स्मृती मंधाना आयसीसी वुमेन्स वर्ल्डकप 2025 मध्ये धावांचा पाऊस पाडते आहे. तिने आतापर्यंत 4 सामन्यात 134 धावा केल्या आहेत. या दरम्यान तिचा स्ट्राईक रेट हा 90 आहे.स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलिया विरूद्ध सर्वाधिक 80 धावांची खेळी केली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनला भाव वाढ नाहीच, कांदा अन् मक्याला काय मिळाला आज दर? Video
सर्व पहा

दरम्यान टीम इंडियाचा आता पुढचा सामना हा इंग्लंड विरूद्ध असणार आहे. हा सामना रविवारी 19 ऑक्टोबर 2025 ला इंदूरच्या मैदानावर रंगणार आहे. भारताला हा सामना जिंकणे फार महत्वाचे आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : सांगलीची स्मृति मंधाना होणार इंदूरची सून, नॅशनल क्रशच्या बायफ्रेंडची भर कार्यक्रमात लग्नाची कबुली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल