TRENDING:

Smriti Mandhana : वर्ल्ड कप जिंकला आता उडवणार लग्नाचा बार! होणाऱ्या नवऱ्याचे स्मृतीसाठी प्रेमाचे पाच शब्द, लग्नाची तारीख ठरली?

Last Updated:

Palash Muchhal on Smriti Mandhana : स्मृतीने टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर पलाश मुच्छल याने सोशल मीडियावर पोस्ट केली. हातात ट्रॉफी आणि समोर स्मृतीचा असलेल्या या फोटोला पलाशने पाच शब्दात कॅप्शन दिलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Palash Muchhal Post After Smriti Mandhana : आयसीसी वुमेन्स वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला असून 49 वर्षात पहिल्यांदाच इतिहास रचला आहे. साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम मॅचमध्ये स्मृती मंधानाने 58 बॉल मध्ये 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शफाली वर्मासोबत तिने पहिल्या विकेटसाठी 104 धावांची पार्टनरशिप करत टीम इंडियाला मजबूत स्टार्ट मिळवून दिला. आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025 टीम इंडियाची सलामीची बॅटर स्मृती मानधना हिच्यासाठी अविस्मरणीय ठरला. या संपूर्ण स्पर्धेत तिने 9 मॅच खेळत 54.25 च्या प्रभावी एव्हरेजने एकूण 434 रन्स केल्या. अशातच आता वर्ल्ड कप जिंकल्यानंतर स्मृती होणाऱ्या नवऱ्यासोबत दिसून आली.
Palash Muchhal on Smriti Mandhana
Palash Muchhal on Smriti Mandhana
advertisement

पलाश मुच्छलसोबत विवाह बंधनात अडकणार

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंदाना लवकरच संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या तयारीला वेग आला आहे. टीम इंडियाने विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर आता हे दोघं विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलंय. मीडिया रिपोर्टनुसार, वर्ल्डकपनंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या लग्नाचा सोहळा पार पडणार आहे. 20 नोव्हेंबरपासून लग्नसमारंभांना प्रारंभ होईल आणि मुख्य विवाह सोहळा सांगलीत पार पडेल. पण लग्न कुठं होणार? याची माहिती अद्याप समोर आली नाही.

advertisement

स्मृती आणि वर्ल्ड कपसोबत पलाश

स्मृतीने टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर पलाश मुच्छल याने सोशल मीडियावर पोस्ट केली. हातात ट्रॉफी आणि समोर स्मृतीचा असलेल्या या फोटोला पलाशने पाच शब्दात कॅप्शन दिलं, 'सबसे आगे होंगे हम हिंदुस्तानी'. तर पलाशने स्मृतीसोबतचा आणखी एक फोटो शेअर केला. यामध्ये स्मृती आणि वर्ल्ड कपसोबत तो दिसतोय.

advertisement

स्मृती मानधनाच्या या शानदार पर्फॉर्मन्समध्ये 1 सेंच्युरी आणि 2 फिफ्टींचा समावेश आहे. या दमदार कामगिरीमुळे स्मृती मंधानाने एकाच वर्ल्ड कप एडिशनमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा भारताची माजी कर्णधार मिताली राजचा जुना रेकॉर्ड मोडला. मितालीने 2017 मध्ये 409 धावा केल्या होत्या, तर स्मृतीने हा आकडा 434 पर्यंत नेला. तिच्या आक्रमक फलंदाजीमुळेच टीम इंडियाला प्रत्येक मॅचमध्ये मजबूत स्टार्ट मिळत गेला आणि टीम इंडिया पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकू शकली.

advertisement

104 धावांची शतकी पार्टनरशिप

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चित्रपटाला साजेशी पुण्यातील घटना, 19 दिवसांत घटस्फोट मंजूर, नेमकं काय घडलं?
सर्व पहा

दरम्यान, साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम मॅचमध्ये देखील स्मृती मानधनाने 58 बॉलमध्ये 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शफाली वर्मासोबत स्मृती मानधनाने 104 धावांची शतकी पार्टनरशिप करत टीम इंडियाच्या मोठ्या टोटलचा पाया रचला. तिचा हा वर्ल्ड कपमधील एकूण पर्फॉर्मन्स जिद्द आणि सातत्य दाखवणारा होता, ज्यामुळे स्मृती मानधना टीम इंडियाच्या या ऐतिहासिक यशात सर्वात महत्त्वाची खेळाडू ठरली.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : वर्ल्ड कप जिंकला आता उडवणार लग्नाचा बार! होणाऱ्या नवऱ्याचे स्मृतीसाठी प्रेमाचे पाच शब्द, लग्नाची तारीख ठरली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल