हातात हात घालून चालताना...
आयुष्याच्या प्रत्येक काळात हातात हात घालून चालताना, या जोडप्याला एकमेकांच्या उपस्थितीत शक्ती मिळो आणि त्यांचे हृदय, मन आणि आत्मा सुसंवादात राहो. त्यांची स्वप्ने एकमेकांशी जोडलेली आणि वाढू दे, आनंदाने आणि खोल समजुतीने भरलेल्या भविष्याकडे त्यांना मार्गदर्शन व्हावं, असं नरेंद्र मोदी पत्रात म्हणाले. पुढे त्यांनी काव्यात्मक शुभेच्छा देखील दिल्या.
advertisement
स्मृतीच्या कव्हर ड्राइव्हची...
स्मृती आणि पलाश विश्वासात रुजलेले, नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहून, प्रेमाने जबाबदाऱ्या स्वीकारून आणि एकमेकांच्या ताकदी आणि अपूर्णतेतून एकत्र वाढणारे सामायिक जीवन निर्माण करो. दोघंही एकत्र एक नवीन, सुंदर जीवन सुरू करत असताना, स्मृतीच्या कव्हर ड्राइव्हची आणि पलाशच्या संगीतमय सिम्फनीला एका अद्भुत भागीदारी तयार होईल, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
दोघांना विजय मिळो... - PM मोदी
टीम ग्रूम आणि टीम ब्राइड यांच्यात सेलिब्रेशन क्रिकेट सामना आयोजित करणं योग्य आहे. जीवनाच्या खेळात या दोन्ही संघांना विजय मिळो. या महत्त्वपूर्ण प्रसंगी मी जोडप्याला माझे आशीर्वाद देतो, असं मोदींनी पत्रात लिहिलं आहे.
लग्नाला कुणाकुणाची उपस्थिती?
दरम्यान, सध्या महिला संघातील सदस्य लग्नाला उपस्थित राहण्यासाठी पोहोचले आहेत. स्मृतीची जवळची मैत्रीण जेमिमा रॉड्रिग्जने इन्स्टाग्रामवर या कार्यक्रमाची एक झलक शेअर केली आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये.
