TRENDING:

PKL Final : प्रो कबड्डी लीगमध्ये दिल्लीचा दणका, थरारक फायनलमध्ये पुणेरी पलटनचा पराभव, शेवटच्या दीड मिनिटात फिरला सामना!

Last Updated:

दबंग दिल्लीने पुणेरी पलटनचा 31-28 ने पराभव करून प्रो कबड्डी लीग 12 ची ट्रॉफी पटकवाली आहे. प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात दिल्ली दुसऱ्यांदा चॅम्पियन बनली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दबंग दिल्लीने पुणेरी पलटनचा 31-28 ने पराभव करून प्रो कबड्डी लीग 12 ची ट्रॉफी पटकवाली आहे. प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात दिल्ली दुसऱ्यांदा चॅम्पियन बनली आहे. शेवटच्या दीड मिनिटात पुण्याला मॅच फिरवण्याची संधी होती, पण दिल्लीच्या डिफेंडरनी आदित्य शिंदेला टॅकल करून ऐतिहासिक विजय मिळवला. याआधी दिल्लीने आठव्या सिझनमध्ये ट्रॉफी जिंकली होती.
प्रो कबड्डी लीगमध्ये दिल्लीचा दणका, थरारक फायनलमध्ये पुणेरी पलटनचा पराभव, शेवटच्या दीड मिनिटात फिरला सामना!
प्रो कबड्डी लीगमध्ये दिल्लीचा दणका, थरारक फायनलमध्ये पुणेरी पलटनचा पराभव, शेवटच्या दीड मिनिटात फिरला सामना!
advertisement

याआधी दबंग दिल्लीने 2021-22 मध्ये पटना पायरेट्सचा पराभव करून पहिल्यांदा ट्रॉफी जिंकली होती. तर पुणेरी पलटनने 2023-24 मध्ये हरियाणा स्टीलर्सचा फायनलमध्ये पराभव केला होता. या मोसमातल्या लीग स्टेजमध्ये दोन्ही टीम 13-13 मॅच जिंकण्यात यशस्वी ठरल्या होत्या, त्यामुळे दोन्ही टीमकडे 26-26 पॉईंट्स होते. पॉईंट्स टेबलवर टॉप-2 मध्ये असलेल्या या टीमनी फायनलमध्ये त्यांचं स्थान निश्चित केलं.

advertisement

पहिल्या हाफमध्ये तगडी फाईट

पहिल्या हाफमध्ये दोन्ही टीमने उत्कृष्ट सुरूवात केली, पण दबंग दिल्लीला पुणेरी पलटनवर दबाव बनवण्यात यश आलं. दिल्लीने पहिल्या हाफमध्ये 20 पॉईंट्स मिळवले, तर पुण्याला 14 पॉईंट्सवर समाधान मानावं लागलं. दिल्लीच्या रेडर्सनी पहिल्या हाफमध्ये 13 रेड पॉईंट्स मिळवले, ज्यात नीरज नरवालने कायम स्मरणात राहील अशा सुपर रेडचाही समावेश होता. हाफ टाईमपर्यंत स्कोअर 20-14 होता, ज्यामुळे दिल्ली मजबूत स्थितीमध्ये पोहोचली.

advertisement

दुसऱ्या हाफमध्ये पुणेरी पलटनचं कमबॅक

दुसऱ्या हाफमध्ये पुणेरी पलटनने कमबॅकचा प्रयत्न केला. आदित्य शिंदेने लागोपाठ रेड करून 10 पॉईंट्स मिळवले, त्यामुळे काही काळ दिल्ली दबावात आली. पण दिल्लीचा कर्णधार आशु मलिकने संयम ठेवला आणि दुसऱ्या हाफमध्येही टीमने 20 पॉईंट्स मिळवले. तर पुण्याला पुन्हा एकदा 14 पॉईंट्स घेण्यात यश आलं. शेवटच्या मिनिटामध्ये आशू मलिकची डू-ऑर-डाय रेड निर्णायक ठरली आणि दिल्लीने रोमाचंक विजय मिळवला.

advertisement

किती कोटी रुपये मिळणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

प्रो कबड्डी लीग जिंकणाऱ्या दिल्लीला 3 कोटी रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. तर रनर अप राहिलेल्या पुणेरी पलटनला 1.8 कोटी रुपये मिळतील.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PKL Final : प्रो कबड्डी लीगमध्ये दिल्लीचा दणका, थरारक फायनलमध्ये पुणेरी पलटनचा पराभव, शेवटच्या दीड मिनिटात फिरला सामना!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल