अत्यंत कमी वयात जगाचा निरोप
वेदांत देवाडिगा आणि यू मुंबाचा युवा खेळाडू बालाभारती यांनी अत्यंत कमी वयात या जगाचा निरोप घेतला. यू मुंबाच्या बालाभारती यांचं वय 20 वर्षे होती, तर जयपूर पिंक पँथर्सच्या वेदांत यांचं वय 23 वर्षे होती. दिवाळीच्या दिवशी मिळालेल्या या दुहेरी दुःखद बातमीमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
advertisement
वेदांत यांच्या अकाली निधनाने धक्का
जयपूर पिंक पँथर्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लिहिले की, "जयपूर पिंक पँथर्स परिवार आमचे सहाय्यक मॅनेजर वेदांत देवाडिगा यांच्या अकाली निधनाने अत्यंत दुःखी आहे. ते आमच्या फॅमिलीचे प्रिय सदस्य होते; त्यांच्या पॅशन आणि समर्पणाची आम्हाला खूप आठवण येईल. या कठीण वेळी आमच्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या प्रियजनांसोबत आहेत."
यू मुंबाची सोशल मीडियावर पोस्ट
तर, यू मुंबाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लिहिलं की, "या वर्षाच्या सुरुवातीला युवा मुंबाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बालाभारती यांच्या अकाली निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे. या अत्यंत कठीण वेळी आमच्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबीय, फ्रेंड्स आणि टीमच्या सहकाऱ्यांसोबत आहेत."
राईट कॉर्नर डिफेंडर
दरम्यान, बालाभारती यांचा जन्म 30 ऑक्टोबर 2005 रोजी पाँडिचेरी येथे झाला होता आणि लहानपणापासूनच त्यांना खेळामध्ये रुची होती. 15 वर्षांच्या एजमध्ये त्यांनी कबड्डीचे ट्रेनिंग घेणे सुरू केले. त्यानंतर बालाभारतीने राईट कॉर्नर डिफेंडर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांनी आतापर्यंत 33 मॅचेस खेळल्या होत्या, ज्यात त्यांच्या नावावर 55 पॉइंट्सची नोंद आहे.