नेहमी स्ट्राइक रेटचा विचार करा
अश्विननं श्रेयस आणि जयस्वाल यांचे कौतुक करताना सांगितलं की, "श्रेयस अय्यर आणि जयस्वाल यांच्यासारखे खेळाडू दुर्मिळ आहेत. ते स्वतःसाठी नव्हे, तर संघासाठी खेळतात आणि नेहमी स्ट्राइक रेटचा विचार करतात." अश्विनच्या मते, हे दोन्ही खेळाडू नेहमी संघाला प्राधान्य देतात, मात्र त्यांना मिळालेली वागणूक योग्य नाही, असं मत अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेलवरून व्यक्त केलं आहे.
advertisement
श्रेयससाठी वाईट वाटतं
शुभमन गिलला संघात स्थान मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना श्रेयससाठी नाराजी देखील व्यक्त केली. अश्विन म्हणाला, "शुभमन गिलसाठी मी आनंदी आहे, पण श्रेयस आणि जयस्वालसाठी मला खूप वाईट वाटत आहे. श्रेयस अय्यरवर हा अन्याय आहे, असं मला वाटतं"
श्रेयस स्टार बॉलर्सला सहज मारतो
श्रेयसने शॉर्ट बॉलच्या कमतरतेवर मात केली आहे आणि तो आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराह आणि कागिसो रबाडासारख्या गोलंदाजांना सहज सिक्स मारत होता. तरीही त्याला वगळणे अत्यंत अन्यायकारक आहे, असं म्हणत अश्विनने बीसीसीआयला सर्वात मोठी चूक दाखवून दिली.
गंभीरच्या खास व्यक्तीची टीका
दरम्यान, श्रेयससाठी आता टी-20 क्रिकेटमध्ये जागा नसल्याचे संकेत देत आहे. श्रेयस 20 सदस्यांच्या टीममध्ये का नाही हे मला समजत नाही. मी अंतिम 15 खेळाडूंबद्दलही बोलत नाहीये, पण तो 20 खेळाडूंमध्येही नाही. याचा अर्थ असा की श्रेयस टी-20 फॉरमॅटमध्ये निवड समितीच्या रणनीतीचा भाग नाही का? असा सवाल अभिषेक नायर याने उपस्थित केला आहे.