परिस्थिती हलाखीची पण पोरीनं जिद्द सोडली नाही
21 एप्रिल 2000 रोजी जन्मलेली राधा यादव, मुंबईतील कंडिवली येथील एका 220 चौरस स्क्वेअर फूट घरात लहानाची मोठी झाली. तिचे वडील ओमप्रकाश यादव हे घराबाहेर भाजी आणि दुधाचा स्टॉल चालवत होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने, क्रिकेट खेळणे हे तिच्या वडिलांच्या आवाक्याबाहेर होते. पण, राधाची क्रिकेटची आवड लहानपणापासूनच होती. ती नेहमी गल्लीत टेनिस बॉल क्रिकेट खेळताना दिसत असे. तिच्या मोठ्या बहिणीनेही तिचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून आपल्या खेळाला बाजूला ठेवलं.
advertisement
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये प्लॅटफॉर्म मिळाला
राधा 12 वर्षांची असताना, 2013 मध्ये स्थानिक प्रशिक्षक प्रफुल्ल नाईक यांची नजर राधाच्या खेळावर पडली. त्यांनी तिच्या वडिलांशी बोलून राधाला मोफत प्रशिक्षण देण्याची जबाबदारी घेतली, तसेच तिच्या क्रिकेट किटचा खर्चही उचलला. नाईक सरांनीच तिला वेगवान गोलंदाजी सोडून डावखुरी फिरकी गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला, राधाने देखील तिला कष्ट कमी पडू दिले नाहीत. वडोदरा येथे स्थायिक झाल्यानंतर, तिला डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगले प्लॅटफॉर्म मिळाले आणि तिने बडोदाच्या अंडर-19 टीमचे यशस्वी नेतृत्वही केलं.
वुमेन्स टी20 इंटरनॅशनलमध्ये पदार्पण
2016 मध्ये, प्रफुल्ल नाईक यांनी वडोदरा येथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आणि राधानेही त्यांच्यासोबत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. वडोदरा येथे स्थायिक झाल्यानंतर, तिला डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगले प्लॅटफॉर्म मिळाले आणि तिने बडोदाच्या अंडर-19 टीमचे यशस्वी नेतृत्वही केले. डोमेस्टिक क्रिकेटमधील दमदार परफॉर्मन्सनंतर, राधा यादवला फेब्रुवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया मध्ये संधी मिळाली आणि तिने वुमेन्स टी20 इंटरनॅशनल मध्ये पदार्पण केलं.
पहिल्या कमाईतून वडिलांना दुकान घेतलं
दरम्यान, राधा यादवने आपल्या पहिल्या कमाईतून तिने वडिलांसाठी एक छोटेसे दुकान विकत घेतले. वडिलांनी आता भाजी विकणं सोडावं आणि शांत जीवन जगावं, अशी राधाची इच्छा आहे. मुंबईतील एका भाजी विक्रेत्याची मुलगी ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर भारताचे प्रतिनिधित्व करणारी राधा, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अशक्य काहीच नाही हे सिद्ध करते.
