राहुल द्रविडचा मुलगा अपयशी
राहुल द्रविडचा मुलगा अन्वय या सामन्यात अपयशी ठरला, तो पहिल्याच बॉलवर शून्य रन करून आऊट झाला. बीके किशोरला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आले. नाबाद 29 रन करण्याव्यतिरिक्त, त्याने बॉलनेही उत्कृष्ट कामगिरी केली. बीके किशोरने 10 ओव्हरमध्ये फक्त 19 रन देत 3 विकेट्स घेतल्या, त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. इंडिया अंडर-19 ट्राय सीरिजमध्ये इंडिया बी टीमचा हा पहिलाच विजय आहे आणि ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहेत.
advertisement
203 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंडिया बी ची सुरूवात खराब झाली. युवराज गोहिल फक्त 3 रन करून आऊट झाला. यानंतर कर्णधार एरॉन जॉर्ज आणि वेदांत त्रिवेदी यांनी चांगली पार्टनरशीप करून टीमला 90 रनपर्यंत पोहोचवलं. पण 23 व्या ओव्हरपासून इंडिया बी ची बॅटिंग गडगडली. नजीफुल्लाह अमिरीने प्रथम आरोन जॉर्जला आऊट केले आणि नंतर अन्वय द्रविडची विकेट घेतली. पुढच्या ओव्हरमध्ये राहुल कुमार देखील आऊट झाल्यावर इंडिया बी ची परिस्थिती आणखी बिकट झाली. 90 ते 115 रनपर्यंत, टीम इंडियाने 6 विकेट गमावल्या आणि पराभवाचा धोका निर्माण झाला. पण, वेदांत आणि बीके किशोर यांच्यातील अर्धशतकी पार्टनरशीपमुळे इंडिया बी ने विजय खेचून आणला.
ट्राय सीरिजमधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, युवराज गोहिलने सर्वाधिक 166 रन केल्या. त्याने 55.33 च्या सरासरीने या रन केल्या. पंगालियानेही 163 रन केल्या. इंडिया ए अंडर-19 टीमचे नेतृत्व करणाऱ्या विहान मल्होत्राने 159 रन केल्या. नैनितालच्या आदित्य रावतने सर्वाधिक आठ विकेट घेतल्या. अफगाणिस्तानच्या अब्दुल अझीझलाही 8 विकेट घेण्यात यश आले.
