हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून रजत पाटीदार आहे. रजत पाटीदारने काही महिन्यांपुर्वीच आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती.या स्पर्धेनंतर काही महिन्यानंतर त्याने त्याच्या नेतृत्वात इराणी चषक जिंकला होता.यानंतर आता मध्यप्रदेशचा कर्णधार बनताच रजत पाटीदारने रणजी ट्ऱॉफी स्पर्धेत डबल सेच्यूरी ठोकली आहे. रजतने 332 बॉलमध्ये 205 नाबाद धावा ठोकल्या आहेत.
रजत पाटीदारने या सामन्यात पंजाब विरूद्ध द्विशतक ठोकून निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, पंजाबचा संघ २३२ धावांवर आटोपला होता. या प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने हे वृत्त लिहिताना 8 गडी गमावून 519 धावा केल्या होत्या. कर्णधार रजत पाटीदार 205 अर्शद खान 60 धावांवर नाबाद खेळत होते.
advertisement
ळत होते.
भारतासाठी तीन कसोटी आणि एक एकदिवसीय सामना खेळलेल्या रजत पाटीदारची दोन वर्षांपासून एकदिवसीय संघात आणि एक वर्ष आणि आठ महिन्यांहून अधिक काळ कसोटी संघात निवड झाली नाही. पण गेल्या वर्षभरात रजत पाटीदारने गेल्या 8 प्रथम श्रेणी डावांमध्ये 663 धावा केल्या आहेत.त्याने गेल्या तीन प्रमुख देशांतर्गत स्पर्धांमध्ये तीन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. तरी देखील त्याची भारतीय संघात निवड झाली नाही आहे. पण आता त्याची टीम इंडियात निवड होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यापूर्वी, भारत अ दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध कसोटी मालिका देखील खेळेल. परिणामी, दोन्ही संघांमध्ये रजत पाटीदारची निवड करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघात कुणाची जागा घेणार?
जर रजत पाटीदारची टीम इंडियासाठी निवड झाली तर तो सध्याच्या तिसऱ्या क्रमांकाच्या स्थानावर बसू शकतो. चेतेश्वर पुजारापासून कोणताही खेळाडू या स्थानावर स्थिरावू शकलेला नाही. साई सुदर्शनला सातत्याने संधी देण्यात आल्या आहेत, परंतु तोही लक्षणीय प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे.
यापूर्वी शुभमन गिल, करुण नायर, केएल राहुल आणि देवदत्त पडिकल यांच्यासह अनेक खेळाडूंना या स्थानावर प्रयत्न करण्यात आले आहेत. तथापि, निवडकर्ते भारतासाठी तीन कसोटी सामने खेळलेल्या रजत पाटीदारला संधी देतील का हे पाहणे महत्वाचे ठरणा आहे.