रणजी ट्रॉफी हंगामातील दोन सामन्यांमध्ये धावांच्या बाबतीत अव्वल सहा फलंदाजांबद्दल चर्चा करूयात. पहिल्या क्रमांकावर अमन मोखाडे आहे.विदर्भाचा फलंदाज अमन मोखाडे या हंगामातील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याने 179.50 च्या प्रभावी सरासरीने 359 धावा केल्या आहेत,ज्यात दोन शतकांचा समावेश आहे.
चंदीगडकडून खेळणाऱ्या अर्जुन आझादने देखील पहिल्या दोन सामन्यांमध्ये 359 धावा केल्या आहेत.परंतु त्याने दोन सामन्यांमध्ये चार डावांमध्ये या धावा केल्या आहेत, तर अमनने दोन सामन्यांमध्ये फक्त दोन डावांमध्ये तितक्याच धावा केल्या आहेत आणि अव्वल स्थान मिळवले आहे अर्जुनने दोन सामन्यांमध्ये दोन शतकेही केली आहेत आणि त्याची सरासरी 89.75 आहे.
advertisement
या यादीत तिसऱ्या स्थानावर दिल्लीचा फलंदाज आयुष दोसेजा आहे, ज्याने दोन सामन्यांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 348 धावा केल्या आहेत, तर त्याची सरासरी 174 आहे.चौथ्या स्थानावर दिल्लीचा फलंदाज सनत सांगवान आहे.ज्याने दोन सामन्यांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 347 धावा केल्या आहेत.
पाचव्या स्थानावर सिक्कीमचा फलंदाज गुरिंदर सिंग आहे.ज्याने दोन सामन्यांमध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकासह 340 धावा केल्या आहेत.या यादीत सहाव्या स्थानावर महाराष्ट्राचा सलामीवीर पृथ्वी शॉ आहे. ज्याने दोन सामन्यांमध्ये एक शतक आणि एका अर्धशतकासह ३०५ धावा केल्या आहेत, त्याची सर्वोत्तम धावसंख्या 222 आहे.
दरम्यान रणजीच्या या हंगामात टीम इंडियाकडून खेळणाऱ्या व सध्या संघाचा भाग नसलेल्या करूण नायर आणि ऋतुराज गायकवाडने देखील शतक ठोकलं आहे. त्यात अजूनही रणजीच्या या हंगामात आणखी सामने खेळवणे बाकी आहे.त्यामुळे आता या खेळाडूंमध्ये पुन्हा कुणाचं नाव अव्वल स्थानी येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
