खरं तर मुंबईचा दुसरा डाव हा 181 धावांवर ऑल आऊट झाला होता. त्यामुळे पहिल्या डावातील 61 धावांची आघाडी या बळावर मुंबईने दुसऱ्या डावात 242 धावांची आघाडी घेतली होती.त्यामुळे जम्मू काश्मीरसमोर 243 धावांचे आव्हान आहे. या आव्हानाच पाठलाग करताना तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत जम्मू काश्मीरने 1 विकेट गमावून 21 धावा केल्या होत्या.त्यामुळे आता जम्मू काश्मीरला विजयासाठी 222 धावांची गरज आहे.
advertisement
मुंबईसाठी चौथा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण आता मुंबईला चौथ्या दिवशी जम्मु काश्मीरला ऑल आऊट करणे आवश्यक आहे. जर मुंबई हे करू शकली नाहाी तर कदाचित मुंबई हा सामना गमावण्याची शक्यता आहे. कारण अवघ्या 222 धावाच त्यांना करायच्या आहेत.त्यामुळे मुंबई या धावा रोखण्यात यशस्वी ठरते की? जम्मू काश्मीर हा सामना जिंकते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुंबईने पहिल्या डावात 386 धावा केल्या होत्या. मुंबईकडून सिद्धेश लाड या एकमेव खेळाडूने 116 धावांची शतकीय खेळी केली होती. त्याच्यासोबत शम्स मुलानीने 91 धावांची खेळी केली होती.या बळावर मुंबईने 386 धावा केल्या होत्या. या प्रत्युत्तरात जम्मू काश्मीरने पहिल्या डावात 325 धावा केल्या होत्या. जम्मू काश्मीरकडून पगार डोब्राने 144 धावांची शतकीय खेळी केली होती.त्या व्यतिरीक्त इतर खेळाडूंना फारशा धावा करता आल्या नाही.
जम्मू काश्मीरने पहिल्या डावात 325 धावा केल्या होत्या त्यामुळे मुंबईला दुसऱ्या डावात 61 धावांची आघाडी घेतली होती. आता मुंबईला दुसऱ्या डाव वाढवण्याची संधी होती. पण जम्मू काश्मीरच्या बॉलरने सामन्यात पुनरागमन करत मुंबईला दुसऱ्या डावात 181 धावांवर ऑल आऊट केले होते.