Mohammad Shami News : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली या दोन्ही सिनिअर खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जबरदस्त पुनरागमन केलं होतं. या पुनरागमनानंतर आणखी एक सिनिअर खेळाडू आता भारतीय संघात वापसी करण्याची तयारी करतो आहे. जर हा खेळाडू संघात आला तर गौतम गंभीरच चांगलंच टेन्शन वाढणार आहे. कारण गौतम गंभीरला आपल्या लाडक्या खेळाडूचा बळी द्यावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रोहित विराटनंतर आता हा तिसरा खेळाडू कोण आहे? जो मैदानात वापसी करणार आहे आणि गंभीरचं टेन्शन वाढवणार आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
पहिल्यांदा गौतम गंभीरच टेन्शन का वाढणार आहे, हे जाणून घेऊयात. तर टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीर सध्या संघात नवीन उद्योन्मुख खेळाडूंना संधी देऊन युवा संघ तयार करायचा आहे. पण रोहित शर्मा आणि विराट कोहलीने यशस्वी पुनरागमन करून संघात आपली दावेदारी पक्की केली.या दावेदारीमुळे दोन युवा खेळाडूंच्या जागा आता गेल्या आहेत. त्यात आता तिसरा सिनिअर खेळाडू मैदानात वापसी करेल अशी चर्चा आहे. कारण त्याची रणजी सामन्यातील कामगिरी पाहता,आता त्याला रोखू शकत नाही.
खरं तर हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आहे. मोहम्मद शमीने बंगाल संघाकडून दोन रणजी सामने खेळले आहेत. यामध्ये पहिल्या सामन्यातील दोन डावात 7 तर दुसऱ्या सामन्यातील दोन डावात 8 अशी एकूण 15 विकेट घेतली आहे. ही त्याची कामगिरी पाहता त्याची संघात निवड होईल असे नक्कीच वाटते. सध्या तरी भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सूरू आहे.त्यानंतर दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात टेस्ट मालिकेसाठी आता मोहम्मद शमीची निवड होते की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गंभीरच्या लाडक्याचा पत्ता कट
दरम्यान जर मोहम्मद शमीची टीम इंडियात वापसी झाली तर गौतम गंभीरचा लाडका खेळाडू हर्षित राणा याचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. कारण तो एकमेव असा खेळाडू जो संघात नवीन गोलंदाज आहे. बाकी इतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे अनुभवी आहेत. त्यामुळे जर शमी संघात आला तर नाईलाजास्तव हर्षित राणाला बाहेर बसावे लागणार आहे.त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टेस्ट मालिकेत मोहम्मद शमीची निवड होते का? हर्षित राणाचा पत्ता कट होतो का? हे पाहावे लागेल.
शमीची रणजीत जबरदस्त कामगिरी
मोहम्मद शमीने बंगालकडून खेळताना जबरदस्त कामगिरी केली आहे. कोलकत्ताच्या ईडन गार्डनमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात बंगालने प्रथम फलंदाजी करताना 279 धावा केल्या होत्या. या बदल्यात गुजरातने 167 धावा केल्या.त्यामुळे बंगालला 112 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर बंगालने दुसऱ्या डावात 8 विकेट गमावून 214 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे गुजरात समोर 327 धावांचे लक्ष्य होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची टीम 185 वर ऑलआऊट झाली. अशा प्रकारे बंगालने 141 इतक्या मोठ्या फरकाने सामना जिंकला.या सामन्यात मोहम्मद शमीने 8 विकेट घेतल्या होत्या. तर याआधीच्या सामन्यात त्याने 7 विकेट घेतल्या होत्या. अशाप्रकारे त्याने 15 विकेट घेतल्या.
