उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात बंगालचा कर्णधार अभिमन्यू इश्वरनने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर बंगालने उत्तराखंडचा 213 रनवर ऑलआऊट केला. मोहम्मद शमीने 14.5 ओव्हरमध्ये 37 रन देऊन 3 विकेट घेतल्या. उत्तराखंडच्या बॅटिंगला शमीचे बॉल खेळताना अडचणींचा सामना करावा लागत होता. मोहम्मद शमीने त्याच्या या स्पेलमध्ये 4 ओव्हर मेडन टाकल्या.
212 रनवर उत्तराखंडच्या 7 विकेट गेल्या होत्या, त्यानंतर शमीने पुढच्या एक रनमध्येच 3 विकेट घेतल्या. यातल्या 3 पैकी 2 विकेट या बोल्ड होत्या, तर एक कॅच विकेट कीपर अभिषेक पोरेलने पकडला. शमीशिवाय सुरज सिंधू जयस्वालने 4 तर इशान पोरेलला 3 विकेट मिळाल्या. उत्तराखंडकडून भुपेन ललवानीने सर्वाधिक 71 रन केले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा बंगालने 8 रनच्या मोबदल्यात 1 विकेट मिळाली.
advertisement
शमीचा आगरकरवर निशाणा
टीम इंडियामध्ये निवड होत नसल्यामुळे मोहम्मद शमीने निवड समिती प्रमुख अजित आगरकरवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. 'माझ्यासोबत चर्चा करणं ही निर्णय घेणाऱ्यांची जबाबदारी आहे, त्यांनी माझ्यासोबत चर्चा केलेली नाही. भारतीय टीम मॅनेजमेंट माझ्यासोबत माझ्या फिटनेसबद्दल अजून बोललेलं नाही. मी त्यांना माझ्या फिटनेसबद्दल सांगणार नाही, त्यांनी मला विचारावं', असं वक्तव्य मोहम्मद शमीने केलं होतं.
'मी जर 4 दिवसांचा रणजी सामना खेळू शकतो, तर 50 ओव्हरची मॅच का खेळू शकत नाही? मी फिट नसतो, तर एनसीएमध्ये असतो, इकडे रणजी ट्रॉफी खेळत नसतो', अशी संतप्त प्रतिक्रियाही मोहम्मद शमीने दिली. दरम्यान निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांना मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. 'माझ्याकडे शमीबद्दल अपडेट नाहीत, तो दुलीप ट्रॉफी खेळला, पण मागच्या दोन-तीन वर्षात तो फार क्रिकेट खेळला नाही. तो बंगालसाठी एक सामना आणि दुलीप ट्रॉफीचा एक सामना खेळला. शमी काय करू शकतो, हे आपल्याला माहिती आहे, पण त्यासाठी त्याला क्रिकेट खेळावं लागेल', असं उत्तर आगरकरने दिलं होतं.