जेव्हा सिलेक्टर्स या मालिकेकडे...
याला काही अर्थ नाही. मला विचार समजत नाही. जेव्हा सिलेक्टर्स या मालिकेकडे पाहतात तेव्हा ते निश्चितच सिलेक्शनचा पुनर्विचार करतील. मला अजूनही प्रश्न पडतो की स्ट्रॅटर्जी नेमकी काय होता. उदाहरणार्थ, कोलकात्यात तुम्ही चार फिरकीपटू खेळवलं आणि प्रत्येकी एकच ओव्हर दिली. एका प्रॉपर बॅटरला खेळवणं चांगलं झालं असतं, असं रवी शास्त्री म्हणाले आहेत.
advertisement
वॉशिंग्टन सुंदरची पोझिशन काय?
त्याचप्रमाणे, शेवटच्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्यात आले होते, परंतु येथे तुम्ही त्याला चौथ्या क्रमांकावर सहज पाठवू शकला असता. सुंदर हा 8 व्या क्रमांकाचा खेळाडू नाही. तो 8 व्या क्रमांकापेक्षा खूपच चांगला फलंदाज आहे, असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.
आठव्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी
दरम्यान, वरच्या फळीत गोंधळ असतानाही, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी आठव्या विकेटसाठी 72 धावांची महत्त्वाची भागीदारी केली आणि थोडीफार झुंज दिली. बारसपारा स्टेडियमवर टीम इंडियाची अवस्था 122 धावांवर 7 विकेट्स अशी बिकट झाली होती, पण या दोघांच्या प्रतिकारामुळे संघ 200 चा आकडा पार करू शकला. सुंदरने 92 बॉलमध्ये 48 धावांची झुंजार खेळी केली, तर कुलदीपने 134 बॉलमध्ये 19 धावा काढून त्याला चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅन्सेनने उत्कृष्ट बॉलिंग करत 48 धावांत 6 विकेट्स घेतल्या, तर सायमन हार्मनने 64 धावा देत 3 विकेट्स घेऊन त्याला चांगली साथ दिली.
