कोहली सलग दुसऱ्यांदा शून्यावर आऊट
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲडिलेड वनडेमध्ये 0 रनवर आऊट झाल्यानंतर टीम इंडियाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने विराट कोहलीच्या विकेटबद्दल एक रंजक तुलना केली आहे. अश्विन म्हणाला की, कोहली ज्या पद्धतीने आऊट झाला, तो प्रकार बऱ्याच अंशी रोहित शर्माच्या काही इनिंग्जमध्ये दिसलेल्या पॅटर्नसारखा होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये कोहली सलग दुसऱ्यांदा शून्यावर आऊट झाला. ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर झेवियर बार्टलेट याने त्याला 'एलबीडब्ल्यू' आऊट केले. बार्टलेटने सुरुवातीला काही बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर स्विंग केले आणि नंतर आत येणाऱ्या एका बॉलने कोहलीला चकमा देत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
advertisement
Just leave It
विराटच्या एका प्रश्नावर आर आश्विने सोशल मीडियावर तीन शब्दात उत्तर दिलं. त्यावरून मोठा गदारोळ माजला आहे. 'जस्ट लीव इट' (Just leave It) असं ट्विट आश्विनने केलं होतं. त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. दुसऱ्या वनडे मॅचमध्ये कोहली ज्या प्रकारे आऊट झाल्यानंतर प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारत पॅव्हेलियनकडे गेला, ते पाहून अनेकांना वाटले की, कदाचित कोहलीची ही शेवटची वनडे सीरिज असेल.
कोहलीची सिडनीत शेवटची मॅच?
कोहलीची ही शेवटची वनडे सीरिज हे अश्विन मान्य करत नाही. यावर आपलं मत व्यक्त करताना तो म्हणाले की, ॲडिलेडमध्ये कोहलीने 'फेअरवेल' (Farewell) च्या या सर्व गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नये. भारताबाहेर एकाच ठिकाणी त्याला किती मॅचेस खेळायला मिळतील? ॲडिलेडमध्ये त्याच्या चांगल्या आठवणी (Memories) आहेत, पण हा या वेन्यूवरचा त्याचा शेवटचा मॅच आहे, असा विचार तो करत असेल असे त्यांना वाटत नाही. हे सर्व त्याच्या मनात चालले नसावे, असंही आश्विन म्हणाला.
रोहितसारखंच विराटचं झालं - आश्विन
अश्विनने त्याच्या 'यूट्यूब चॅनल'वर (YouTube Channel) सांगितलं की, झेवियर बार्टलेटने दोन आऊटस्विंगर टाकले आणि नंतर लाईन सरळ ठेवून विराट कोहलीला एलबीडब्ल्यू आऊट केले. आता, रोहित शर्माच्या आऊट होण्याची ही एक परिचित पद्धत आहे. रोहितच्या बाबतीत हे नेहमीच दिसेल, मग तो साउथ आफ्रिकेतील कगिसो रबाडाविरुद्ध असो किंवा ऑस्ट्रेलियातील पॅट कमिन्सविरुद्ध असो. आत आलेल्या त्या बॉलवर विराट ज्याप्रकारे आऊट झाला, त्याने प्रत्यक्षात लाईन चुकवली, असं मत आश्विनने व्यक्त केलं आहे.
कोहली पुनरागमन करेल, अश्विनचा विश्वास
सिडनी वनडेमध्ये (Sydney ODI) कोहली पुनरागमन करेल, असा विश्वास अश्विन यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, सुदैवाने रोहितला थोडी नशिबाची साथ मिळाली आणि त्याने त्याचा फायदा घेऊन स्कोर केला. पण सिडनीमध्ये विराट रन न करण्याचे कोणतेही कारण नाही. गेल्या दोन मॅचमध्ये तो कसा आऊट झाला, यावर तो नक्कीच विचार करत असेल, असे त्यांना वाटते. हे सोपे नसणार, पण विराट या परिस्थितीतून नक्कीच बाहेर येईल, अशी आशा त्यांना आहे.
