TRENDING:

RCB विकत घेण्यासाठी 6 जणांमध्ये चुरस, दुसरं नाव सर्वात शॉकिंग, अचानक झाली सरप्राईज एन्ट्री!

Last Updated:

आयपीएल 2026 सुरू होण्याआधीच आरसीबीला नवा मालक मिळू शकतो. तब्बल 6 जणांनी आरसीबी विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
RCB New Owner : आयपीएल 2026 सुरू होण्याआधीच आरसीबीला नवा मालक मिळू शकतो. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला आरसीबी खरेदी करण्यास इच्छुक असल्याची बातमी समोर आली होती, पण आता क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आरसीबी विकत घेण्यासाठी सहा दावेदार समोर आले आहेत. या यादीमध्ये अदानी ग्रुप आणि जिंदाल ग्रुप (JSW) चे मालक पार्थ जिंदाल यांचं नावही समोर आलं आहे.
RCB विकत घेण्यासाठी 6 जणांमध्ये चुरस, दुसरं नाव सर्वात शॉकिंग, अचानक झाली सरप्राईज एन्ट्री!
RCB विकत घेण्यासाठी 6 जणांमध्ये चुरस, दुसरं नाव सर्वात शॉकिंग, अचानक झाली सरप्राईज एन्ट्री!
advertisement

आयपीएल 2026 आधी आरसीबीची विक्री

आरसीबीची मालकी सध्या ब्रिटीश कंपनी डियाजिओ पीएलसीकडे आहे, पण ही कंपनी आता फ्रँचायझीपासून वेगळी होण्यासाठी तयार आहे. जेएसडब्ल्यूचे मालक पार्थ जिंदाल यांनी आरसीबीची टीम विकत घ्यायची इच्छा व्यक्त केली आहे. पार्थ जिंदाल यांचा जेएसडब्ल्यू ग्रुप हा आयपीएलच्याच दिल्ली कॅपिटल्सचाही सहमालक आहे. दिल्ली कॅपिटल्सची मालकी सध्या जिंदाल ग्रुप आणि ग्रँडी मल्लिकार्जुन राव (जीएमआर) ग्रुपकडे आहे. जर जेएसडब्ल्यूने आरसीबीची टीम विकत घेतली तर जीएमआर ग्रुप हा दिल्लीचा एकमेव मालक राहिल का टीम नवीन मालक शोधेल? याबाबतही सस्पेन्स निर्माण झाला आहे.

advertisement

रेसमध्ये एकूण 6 नावं

आरसीबी विकत घेण्यासाठी आतापर्यंत 6 दावेदार पुढे आले आहेत. यामध्ये अदार पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट, अदानी ग्रुप, जेएसडब्ल्यू, दिल्लीतील व्यावसायिक आणि अमेरिकेतल्या 2 कंपन्या आरसीबी विकत घेण्यासाठी इच्छुक आहेत.

अदानी ग्रुपची एन्ट्री

आरसीबी विकत घेणाऱ्यांच्या दावेदारांमध्ये फक्त जिंदाल ग्रुपच नाही तर अदानी ग्रुपचीही एन्ट्री झाली आहे. 2021 मध्ये अदानी ग्रुपने गुजरात टायटन्स खरेदी करण्यात रस दाखवला होता, पण त्यांना यात यश आलं नाही. अदानी ग्रुपकडे डब्ल्यूपीएल (महिला प्रीमियर लीग) च्या गुजरात टायटन्सची मालकी आहे. आता आरसीबीची विक्री करता आली तर अदानी ग्रुपची आयपीएलमध्येही एन्ट्री होईल.

advertisement

आरसीबीची विक्री किती किमतीला?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनला भाव वाढ नाहीच, कांदा अन् मक्याला काय मिळाला आज दर? Video
सर्व पहा

आरसीबी आयपीएलमधील सगळ्यात लोकप्रिय टीमपैकी एक आहे. आरसीबीचे चाहतेही मोठ्या प्रमाणावर आहेत. सोशल मीडियावरही आरसीबीचे फॉलोअर्स सगळ्यांपेक्षा जास्त आहेत. पण विक्री आधी आरसीबीची ब्रॅण्ड व्हॅल्यू किती आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ब्रिटिश कंपनी आरसीबीची ब्रॅण्ड व्हॅल्यू 17,859 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगते, पण अदार पूनावाला या किंमतीसोबत सहमत नसल्याचंही सांगण्यात येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
RCB विकत घेण्यासाठी 6 जणांमध्ये चुरस, दुसरं नाव सर्वात शॉकिंग, अचानक झाली सरप्राईज एन्ट्री!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल