रिकी पॉन्टिंगने भारतीय खेळाडूंच्या वर्तनावर टीका केल्याचं या वृत्तामध्ये म्हटलं गेलं. 'हा सामना नेहमीच लक्षात राहिल, ज्यात भारताचा पराभव झाला. पाकिस्तानी खेळाडूंनी हस्तांदोलनाची इच्छा व्यक्त करून आपण जंटलमन्स गेमचे खरे विजेते असल्याचं सिद्ध केलं, टीम इंडिया यात लूजर असल्याचं दिसलं', असं पॉन्टिंग म्हणाल्याचा दावा केला गेला.
हे विधान व्हायरल होताच भारतीय चाहत्यांनी संताप व्यक्त केला, तसंच पॉन्टिंगवर टीका केली. या वादानंतर अखेर पॉन्टिंगने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केलं. 'सोशल मीडियावर माझ्या नावाने काही वक्तव्यं केली जात आहेत याची मला माहिती आहे. मी असे कोणतेही विधान केलेले नाही. खरं तर, मी आशिया कपबाबत कोणतीही सार्वजनिक टिप्पणी केलेली नाही', असं पॉन्टिंग म्हणाला आहे.
advertisement
भारतीय खेळाडू हस्तांदोलन न केल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) संतापले आहे. बोर्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) पत्र लिहून याबद्दल तक्रार केली आहे. यासोबतच, पीसीबीने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची मागणीही केली आहे. आयसीसीने मात्र पीसीबीची ही मागणी फेटाळून लावली आहे.