विराट कोहली आणि रोहित शर्माच्या भवितव्याचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच निकाल लागणार आहे, असे रिकी पॉन्टिंग यांनी सांगितले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हे दोन्ही खेळाडू कसे खेळतात,त्यावरून ते 2027 चा वर्ल्डकप खेळू शकतील की नाही, हे ठरवले जाणार आहे,असे रिकी पॉटींग सांगतो.
माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याची बातचीत करतान पॉटींग सांगतो,कोहली आणि रोहितने फक्त 2027 च्या वर्ल्डकपबद्दल विचार करू नये. त्याऐवजी छोटे छोटे लक्ष्य ठरवावेत आणि प्रत्येक सामना त्यांच्या पूर्ण ताकदीने खेळण्याची तयारी ठेवावे,तरच त्यांची पुढची वाटचाल योग्य दिशेने जाईल असे पॉटींग यांनी म्हटले आहे.
advertisement
"मी खेळात सर्वकाही साध्य केले आहे हे ऐकायला मला आवडत नाही.त्यामुळे काही छोटे छोटे लक्ष्य ही असली पाहिजेत. फक्त 2027 च्या वर्ल्ड कपची काळजी करून चालणार नाही.तसेच "विराट नेहमीच प्रेरणादायी राहिला आहे.मला खात्री आहे की त्याने ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी आपले ध्येय निश्चित केले आहे. त्यामुळे विराटने वर्ल्डकपची काळजी करण्यात वेळ वाया घालवू नये.त्याऐवजी छोट्या छोट्या लक्षावर लक्ष केंद्रीत करून वाटचाल करावी असा सल्ला विराट कोहलीने दिला आहे.
रोहित आणि कोहलीची पहिल्या एकदिवसीय सामन्यातील कामगिरी तितकीशी चांगली नव्हती, परंतु रवि शास्त्रींना वाटते की त्यांना वेळ आणि संधी दिल्या पाहिजेत.आयपीएलनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बराच काळ अनुपस्थित राहिल्यामुळे, दोघांनाही त्यांची लय परत मिळवण्यासाठी थोडा वेळ लागेल.पण हे दोन महान खेळाडू त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळवू शकतील की नाही हे काळच सांगेल. आपण घाई करू नये. ते खेळासाठी किती भूक आणि उत्साह सोडतात यावर देखील अवलंबून आहे. रोहित आणि कोहली हे फक्त फलंदाज नाहीत, तर ते प्रेरणास्थान आहेत. त्यांना वेळ आणि पाठिंबा देणे हा योग्य दृष्टिकोन आहे, असे रवि शास्त्री सांगतात.