शादाब खानने आतापर्यंत पाकिस्तानकडून 70 वनडे आणि 112 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. खराब कामगिरीनंतर शादाब खानला पाकिस्तानच्या टीममधून बाहेर केलं गेलं होतं, त्यानंतर त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. शादाब खानच्या खांद्यावर या वर्षाच्या सुरूवातीला लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती, तेव्हापासून तो टीममधून बाहेर आहे. खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर शादाब खान फिट झाला आहे, तसंच तो पुढच्या महिन्यात कमबॅक करू शकतो. शादाब खान हा शस्त्रक्रियेआधी टीमचा उपकर्णधार होता, त्यामुळे आता तो टीममध्ये आला तर त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती होऊ शकते.
advertisement
श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानची सीरिज
पाकिस्तान क्रिकेटमधल्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शादाब 11 ते 15 नोव्हेंबरदरम्यान श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमधून पुनरागमन करू शकतो, कारण त्याचं रिहॅब चांगल्या पद्धतीने सुरू आहे. पुढच्या वर्षी होणारा वर्ल्ड कप लक्षात घेता त्याला टीमचा कर्णधार म्हणून नियुक्त केलं जाऊ शकतं.
पाकिस्तानने सलमान अली आघाच्या नेतृत्वात आशिया कप खेळला होता, पण फायनलमध्ये पाकिस्तानचा भारताविरुद्ध पराभव झाला होता, त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नवा कर्णधार नियुक्त करण्याच्या विचारात आहे. सध्या पाकिस्तानची टीम घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट मॅचची सीरिज खेळत आहे, या सीरिजच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा विजय झाला आहे. याचसोबत पाकिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहचलं आहे.