ओमानविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला 2 फोर मारता आल्या. 92.31 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केल्यानंतर वैभव आऊट झाला. रायजिंग स्टार आशिया कपच्या सामन्यात युएईविरुद्ध वैभवने 42 बॉलमध्ये 144 रनची वादळी खेळी केली, ज्यात 11 फोर आणि तब्बल 15 सिक्सचा समावेश होता.
ओमानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार जितेश शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर भारताने ओमानला 20 ओव्हरमध्ये 135/7 वर रोखलं. वसीम अलीने 45 बॉलमध्ये नाबाद 54 रन केले. तर हमाद मिर्झाने 16 बॉलमध्ये 32 रनची खेळी केली. भारताकडून सुयश शर्मा आणि गुरजापनीत सिंग यांना 2-2 विकेट मिळाल्या. तर विजयकुमार वैश्यक, हर्ष दुबे आणि नमन धीर यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
टीम इंडियासाठी करो या मरो
ओमानविरुद्धचा हा सामना टीम इंडियासाठी करो या मरो चा आहे, कारण या सामन्यात पराभव झाला तर टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात येईल आणि ओमान पुढच्या राऊंडसाठी क्वालिफाय होईल. 3 पैकी 3 सामने जिंकलेली पाकिस्तान आधीच पुढच्या राऊंडमध्ये पोहोचली आहे. तर भारताने 2 पैकी 1 मॅच जिंकली असून एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. ओमाननेही त्यांच्या 2 पैकी 1 मॅच जिंकली आणि एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. आशिया कप रायजिंग स्टार स्पर्धेत भारत, पाकिस्तान, ओमान आणि युएई एका ग्रुपमध्ये आहेत.
