रित्विक आप्पिडी हा युएस अंडर 19 क्रिकेट संघाचा एक गोलंदाज आहे. तो 25 ऑगस्ट 2008 रोजी जन्मला असून, सध्या त्याचे वय 17 वर्षे आहे.याच रित्विक आप्पिडीने वैभव सूर्यवंशीची विकेट घेतली आहे. वैभव फक्त 4 बॉलमध्ये 2 धावा करून बाद झाला आहे.
रित्विकने एक उत्तम लेंथचा बॉल टाकला जो ऑफ स्टंपच्या बाहेर अँगल करत होता. वैभव मोठा फटका मारण्यासाठी पुढे आला, पण इनसाइड एज घेऊन स्टंप्सवर आदळली होती.या विकेटनंतर रित्विकने जोरदार सेलीब्रेशन केले होते. या संदर्भातला व्हिडिओ समोर आला आहे.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीसमोर प्रथम फलंदाजी करायला उतरलेला युसएचा डाव हा 107 धावांवर ऑल आऊट झाला होता.युसएकडून नितीश सुदीनीने सर्वाधिक 36 धावा केल्या होत्या.त्याच्या व्यतिरीक्त इतर कुणालाही मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या.दरम्यान युएसचा हा डाव ऑल आऊट करण्यात भारताच्या हेनिल पटेलने मोलाची भूमिका बजावली आहे.भारताकडून हेनिल पटेलने सर्वाधिक 5 विकेट तर दिपेश देवेंद्रन,आरएस अंम्ब्रिश,खिलान पटेल आणि वैभव सूर्यवंशीने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
दरम्यान युएसने दिलेल्या 107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 4 ओव्हरमध्ये 21 धावा करून 1 विकेट गमावली आहे. सध्या आयुष म्हात्रे आणि वेदांत त्रिवेदी मैदानात आहेत. तसेच सामन्या दरम्यान पाऊस पडल्याने सध्या खेळ थांबवण्यात आला आहे.
