Team India News : टीम इंडियाचा सिनिअर खेळाडू रोहित शर्मा याच्याकडून वनडेच कर्णधारपद काढून घेण्यात आलं आहे. त्याच्याजागी शूभमन गिलला वनडेचा नवा कर्णधार बनवण्यात आलं आहे. आता शुभमन गिल टेस्ट आणि वनडे अशा दोन फॉरमॅटचा कर्णधार बदला आहे. तर भारतीय संघाच्या टी20चं कर्णधारपद हे सूर्यकुमार यादवकडे आहे. पण सूर्या काहीच दिवसांचा पाहुणा आहे.कारण रोहित शर्मा सोबत जे घडलं आहे तेच आता सूर्यकुमार यादव सोबत घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सूर्या आता काही दिवसांचा पाहुणा आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या नेमकं मनात काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
खरं तर भारतीय क्रिकेटमध्ये स्प्लिट कॅप्टन्सीचा जूना इतिहास आहे. अगदी अनिल कुंबळे आणि महेंद्रसिंह धोनीपासून या स्प्लिप्ट कॅप्टन्सीला पहिल्यांदा सूरूवात झाली होती. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी स्लिप्ट कॅप्टन्सी केली.आता शुभमन गिल आणि सुर्यकुमार यादव आहेत. पण ही स्प्लिट कॅप्टन्सी हा बीसीसीआयचा भविष्याचा भाग नाही.त्यामुळे सूर्यकुमार यादवचा गेम होण्याची शक्यता आहे.
खरं तर तीन क्रिकेट फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार ठेवणे हे बीसीसीआयने कधीच मान्य केले नाही. दोन कर्णधार ठेवले आहेत पण परिस्थितीनुसार असे निर्णय घेतले गेले आहेत.आता सध्या सुद्धा पहिल्यांदा शुभमन गिलच्या खांद्यावर टेस्टच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली.त्यानंतर आता वनडेच कर्णधारपद देखील त्यांच्याकडे सोपवलं गेलं आहे. आणि टी20 च कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे आहे. पण अजित आगरकर यांच्या मते तीनही फॉरमॅटसाठी तीन कर्णधार असणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तीनही फॉरमॅटसाठी एकच कर्णधार असावा याकडे बीसीसीआयची होरा आहे. अशा परिस्थितीतीत सूर्यकुमार यादवकडूनही कर्णधार पद काढून घेतले जाऊ शकते आणि शुभमन गिलकडे सोपवले जाऊ शकते.अशाप्रकारे गिल या तीनही फॉरमॅटमध्ये कॅप्टन होण्याची शक्यता आहे.अशीच बीसीसीआयची रणनिती असल्याचे समजते आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
वनडे मालिका
१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड
२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन