खरं तर ही घटना 38 व्या ओव्हर दरम्यान घडली आहे. या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर डेवाल्ड ब्राविसने एक कट शॉट वेगाने खेळला होता. हा बॉल थेट रोहित शर्माच्या दिशेने कॅचसाठी गेला होता.यावेळी रोहितने चित्याच्या वेगाने डाईव्ह मारून कॅच घेण्याचा प्रयत्न केला. पण या दरम्यान त्याच्या हातून बॉल निसटला होता. पण जरी कॅच सुटला असला तरी त्याने 3 अतिरीक्त धावा रोखल्या होत्या. त्यामुळे ज्याप्रमाणे रोहित शर्माने डाईव्ह मारून बॉल रोखला होता, ते पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
advertisement
पण कॅच ड्रॉप झाल्यानंतर तो निराश झाला होता, पण प्रेक्षकांनी त्याच्या फिल्डिंगचे कौतुक केले होते.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खरं तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने मैदानात जबरदस्त पुनरागमन केलं आहे. विशेष म्हणजे या दोन खेळाडूंनी नुसती फलंदाजीत नाही तर फिल्डिंग आणि कॅच घेताना जबरदस्त कामगिरी केली आहे.त्यामुळे या गोष्टी पाहून आश्चर्य वाटतं.
रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड
तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने 73 बॉलमध्ये 75 धावांची खेळी केली आहे. या खेळी दरम्यान त्याने सात चौकार आणि तीन षटकार लगावले आहेत. यासोबत रोहित शर्माने एक मोठा टप्पा गाठला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावा पूर्ण केल्या. या सामन्यापूर्वी रोहित 20,000 धावांचा टप्पा गाठण्यापासून 27 धावा दूर होता,जो त्याने सहज साध्य केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावा करणारा रोहित हा फक्त चौथा भारतीय फलंदाज आहे. रोहितपूर्वी फक्त सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनीच हे यश मिळवले होते.
