कलाकारीची झलक दाखवली
टीम इंडियाच्या वर्ल्ड कप स्टार खेळाडू रिलायन्स फाउंडेशनच्या ‘युनायटेड इन ट्रायम्फ’ कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. तर त्यावेळी रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांनी देखील हजेरी लावली होती. तसेच बिग बी अमिताभ बच्चन, शाहरूख खान आणि टीम इंडियाचे इतर खेळाडू देखील उपस्थित होते. अशातच यावेली जेमिमाने आपल्या कलाकारीची झलक यावेळी दाखवली.
advertisement
गाणं ऐकून रोहित शर्मा शॉक
रिलायन्स फाउंडेशनच्या ‘युनायटेड इन ट्रायम्फ’ या विशेष कार्यक्रमात जेमिमा रॉड्रीग्जने सर्वांचं मन जिंकलं. जेमिमाने यावेळी 'आशाएँ खिलें दिल की...' हे गाणं जेमिमाने सर्वांसमोर सादर केलं. यावेळी तिचं गाणं ऐकून रोहित शर्मा आणि इतर सदस्य देखील शॉक झाले. अमिताभ बच्चन यांना देखील याचं कौतुक वाटलं. हरमनप्रीत कौरने देखील टाळ्या वाजवत तिला दाद दिली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा Video
एकमेकांचा हात पकडून कार्यक्रमात एन्ट्री
दरम्यान, या कार्यक्रमात प्रेरणादायी क्षण, क्रीडा-समर्थन आणि सामाजिक उपक्रमांबाबत सकारात्मक संदेश देण्यात आला. तर टीम इंडियाचे आयसीसी ट्रॉफी जिंकणारे खेळाडू यावेळी उपस्थित होते. या विशेष सोहळ्यात क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची प्रेयसी महिका शर्मा देखील उपस्थित होती. या कार्यक्रमात दोघांनी एकमेकांचा हात पकडून कार्यक्रमात एन्ट्री घेतली.
