पहिल्या ओव्हरपासून त्रास
रोहित शर्मा याला मिचेल स्टार्क याने पहिल्या ओव्हरपासून त्रास दिला. तर दुसरीकडे हेझलवूडने देखील घातक बॉलिंग केली. मात्र, चौथ्या ओव्हरमध्ये हेझलवूडने रोहित शर्माला पाचव्या स्टंपवर बॉल फेकला अन् रोहितने डिफेन्ड करता सेकंड स्लीपमध्ये कॅच सोपवला. त्यामुळे फॅन्सचा हिरमोड झाल्याचं दिसलं. तसेच रोहित शर्माचा कॉन्फिडन्स देखील कमी झाल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
advertisement
चौथ्या स्टंपवरील बॉल खेळला अन्
विराट कोहली फ्रेश दिसत होता. विराटने पहिल्या बॉलपासून सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विराटने आक्रमक खेळ न दाखवता आरामात खेळण्याचा प्रयत्न केला पण सातव्या ओव्हरमध्ये विराटने तीच चूक केली, जी तो आधीही करत होता. विराट कोहलीने चौथ्या स्टंपवरील बॉल खेळला अन् विराटची विकेट गेली. विराटला भोपळाही फोडता आला नाही, तो शुन्यावर बाद झाला.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन - ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.