कोलकत्तामध्ये आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्याचा कार्यक्रम सूरू आहे. या कार्यक्रमादरम्यान आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या 2026 च्या टी20 वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माची आयसीसी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.या घोषणेनंतर कार्यक्रमात बोलताता रोहित शर्माने जय शाह सह सगळ्यांचे आभार मानले आहे.क्रिकेट खेळत असताना कुणालाही आयसीसीचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलेले नाही, त्यामुळे हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. आशा आहे आपण गेल्या वेळसारखं मॅजिक दाखवू,असे रोहित शर्मा म्हणाला आहे.
advertisement
दरम्यान रोहितने 2024 मध्ये टी20 वर्ल्डकप जिंकून दिला होता, त्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती.आता टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्याला त्या फॉरमॅटचा ब्रँड अॅम्बेसेडर करण्यात आला आहे. त्यामुळे रोहितच्या फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोणत्या गटात कोणता संघ
गट अ : भारत,पाकिस्तान,अमेरिका,नेदरलँड्स,नामिबिया
गट ब : ऑस्ट्रेलिया,श्रीलंका,आयर्लंड,ओमान, झिम्बाब्वे
गट क : इंग्लंड,वेस्ट इंडिज,बांगलादेश, नेपाळ, इटली
गट ड : न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका,अफगाणिस्तान,कॅनडा,यूएई
भारताचे सामने कधी पार पडणार
भारत वि. युएसए : 7 फेब्रुवारी (मुंबई)
भारत वि. नामिबिया : 12 फेब्रुवारी (दिल्ली)
भारत वि.पाकिस्तान : 12 फेब्रुवारी (कोलंबो)
भारत वि. नेदरलँड : 18 फेब्रुवारी (अहमदाबाद)
दोन्ही देशात कुठे सामने पार पडणार
भारत: मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई
श्रीलंका: आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (कोलंबो), पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (कँडी) आणि सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (कोलंबो)
