वनडे वर्ल्ड कप जिंकणं माझं स्वप्न - रोहित शर्मा
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा वुमेन्स क्रिकेटरसोबत गप्पा मारतोय. वनडे वर्ल्ड कप जिंकणं हे माझं स्वप्न आहे. मेन्स आणि वुमेन्स टीममध्ये एक टीम कॉमन आहे की, आयसीसी नॉक आऊट मॅचमध्ये आपल्या टीम हारत आहेत. मेन्स टीम सेमीफायनलमध्ये हारतीये, तुमची टीम फायनलमध्ये हारत आहे. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आम्ही फायनलमध्ये हारलो. त्यावेळी त्या लीगमध्ये आम्ही एकही मॅच गमावली नव्हती. त्यानंतर 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध आम्ही मॅच हारली, त्यानंतर एकही मॅच गमावली नाही. पण सेमीफायनलला हारलो, असं रोहित शर्मा या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतोय.
advertisement
एकमेकांना आव्हान केलं पाहिजे - हिटमॅन
फायनलच्या आधी आपल्याला चांगली तयारी करावी लागणार आहे. दोन्ही टीमला फायनलच्याआधी एकमेकांना मदत केली पाहिजे. मेन्स टीमने वुमेन्स टीमला आणि वुमेन्स टीमने मेन्स टीमला आव्हान केलं पाहिजे, असं रोहित शर्मा म्हणाला. त्यामुळे एकमेकांच्या चुका समजतील, असं रोहित शर्मा म्हणताना दिसतोय. हिटमॅन, स्मृती मानधना आणि जेमिमाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तसेच रोहित शर्माने वुमेन्स टीमला स्क्रिप्ट लिहून दिली, असा दावा केला जात आहे.
एका वाक्यात वुमेन्स टीमचं कौतुक
हा व्हिडीओ चार पाच वर्ष जुना असल्याची माहिती आहे. रोहित शर्माने असा कोणताही सल्ला सेमीफानयल मॅचपूर्वी दिला नव्हता. रोहित शर्मा अनेकदा वुमेन्स टीमला सल्ला देताना दिसतो. मुंबई इंडियन्सच्या वुमेन्स खेळाडूंसोबत अनेकदा क्रिकेटविषयी चर्चा देखील होते. टीम इंडियाने सामना जिंकल्यानंतर इन्टाग्राम स्टोरी शेअर करत रोहित शर्माने एका वाक्यात कौतुक केलं. वेल डन टीम इंडिया, असं रोहितने इन्टाग्राम स्टोरीवर लिहिलं होतं. त्यावेळी त्याने टीम इंडियाचा फोटो देखील स्टोरीवर शेअर केला होता.
IND W vs AUS W : नशिबाने एक संधी मिळाली, पण कर्माने साथ सोडली! 'लेडी सेहवाग'च्या करिअरचा THE END?
तिसरी वर्ल्ड चॅम्पियन टीम कोणती?
दरम्यान, यंदा महिला क्रिकेटला नवा वर्ल्ड कप विनर मिळणार आहे, कारण इतिहासात पहिल्यांदाच महिला वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड आहे. त्यामुळे तिसरी वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान साऊथ अफ्रिका आणि भारताकडे आहे.
