विराटसाठी अॅडलेड सेफ
अॅडलेड ओव्हलच्या या मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट कोहलीने चार सामन्यांमध्ये 61 च्या प्रभावी सरासरीने 244 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आहेत. या मैदानावर कोहलीचा कसोटी विक्रम आणखी उल्लेखनीय आहे, पाच सामन्यांमध्ये 53.70 च्या सरासरीने 537 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तीन शतके आहेत. तर याच मैदानावर विराटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 12 मॅचमध्ये पाच शतकं आहेत. त्यामुळे विराटसाठी अॅडलेड सेफ गेम असणार आहे.
advertisement
रोहित शर्मासाठी धोक्याची घंटा
दुसरीकडे, रोहित शर्माचा ॲडलेड येथील रेकॉर्ड थोडा साधारण आहे. सहा वनडे मॅचमध्ये त्याने 21.83 च्या ॲव्हरेजने 131 रन्स केल्या आहेत आणि 43 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. मात्र, रोहितच्या अनुभवामुळे आणि एकट्याच्या बळावर सामना जिंकून देण्याच्या क्षमतेमुळे टीम इंडियाच्या बॅटिंग लाईन-अपमध्ये तो महत्त्वाचा प्लेअर आहे. मात्र, रोहित शर्मा कधीही कुठंही आपला जलवा दाखवू शकतो. याची प्रचिती सर्वांनाच असेल. अशातच आता रोहित शर्माच्या कामगिरीवर देखील लक्ष असणार आहे.
सुनील गावस्कर म्हणतात...
दरम्यान, भारत अजूनही खूप चांगला संघ आहे. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. रोहित आणि कोहली पुढील दोन सामन्यात मोठे धावा काढल्यास आश्चर्यचकित होऊ नका. ते जितके जास्त खेळतील, ते नेटमध्ये जितका जास्त वेळ घालवतील तितके जास्त थ्रोडाऊन त्यांना मिळतील, असं सुनील गावस्कर म्हणाले आहेत.