TRENDING:

Rohit Sharma : वनडे क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घेण्यावर हिटमॅनचा शॉकिंग खुलासा, म्हणाला 'आपलं स्वप्न कधीच...'

Last Updated:

Rohit Sharma On ODI Retirement : जीवन तिथंच संपत नाही याची रोहितला जाणीव होती. रोहितने स्वतःला पुन्हा सावरलं आणि 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपवर आपले लक्ष केंद्रित केलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Rohit Sharma On Early Retirement : 19 नोव्हेंबर 2023 चा दिवस टीम इंडियासाठी काळा दिवस ठरला होता. भारतीय क्रिकेटमध्ये हा दिवस जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा रोहित शर्माचा रडणारा चेहरा समोर येईल. रोहित शर्मासाठी हा दिवस सर्वात वाईट दिवस ठरला. टीम इंडियाचा अनुभवी बॅट्समन रोहित शर्माने सांगितलं की, 2023 च्या वर्ल्ड कपमधील पराभवानंतर रोहितने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला होता.
Rohit Sharma On ODI Retirement
Rohit Sharma On ODI Retirement
advertisement

लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न...

अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप फायनल मॅचनंतर रोहित पूर्णपणे खचला होता. रोहितच्या मते, त्या स्पर्धेने त्याच्या शरीरातील सर्व एनर्जी शोषून घेतली होती आणि रोहितला पुन्हा बॅट हातात पकडावी असं वाटत नव्हतं. तो अनेक दिवस लोकांपासून दूर राहिला होता, कारण लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न अवघ्या काही पावलांवरून हुकलं होतं.

advertisement

जीवन तिथंच संपत नाही...

नुकत्याच गुडगावमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना रोहितने आपल्या भावना व्यक्त केल्या. हिटमॅन म्हणाला की, तो पराभव स्वीकारणे खूप कठीण होतं, परंतु जीवन तिथंच संपत नाही याची त्याला जाणीव होती. त्याने स्वतःला पुन्हा सावरलं आणि 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपवर आपले लक्ष केंद्रित केलं. जरी निवृत्तीचा विचार मनात आला होता, तरीही आपल्याला हा खेळ आवडतो आणि हे आपलं स्वप्न आहे, याची सतत जाणीव करून दिल्याने मी पुन्हा मैदानात परतू शकलो, असं म्हणत रोहितने वनडेमधील निवृत्तीवर खुलासा केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अमरावतीतील प्रसिद्ध भजी पोहे, 30 रुपयांत भरेल पोट, अशी चव कुठंच नाही Video
सर्व पहा

या कठीण काळातून बाहेर पडल्यानंतर रोहितने केवळ पुनरागमनच केलं नाही, तर त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2024 चा टी-20 वर्ल्ड कप आणि 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकली. सध्या टीम इंडियाचा वनडे कॅप्टन शुभमन गिल असला तरी, रोहितने त्या कठीण प्रसंगातून सावरून देशाला मिळवून दिलेले यश अविस्मरणीय ठरले. रोहितच्या मते, मैदानावर पुन्हा परतण्यासाठी त्याला खूप मानसिक शक्ती आणि ऊर्जेचा वापर करावा लागला होता.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : वनडे क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घेण्यावर हिटमॅनचा शॉकिंग खुलासा, म्हणाला 'आपलं स्वप्न कधीच...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल