खरं तर रोहित शर्मा आणि विराट कोहली शेवटचे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळले होते. दोघांनी त्यावेळी भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यास मोलाची भूमिका बजावली होती. हा सामना 9 मार्च 2025 रोजी रंगला होता. या सामन्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे आयपीएल 2025 मध्ये खेळले होते. पण एकत्र संघातून खेळण्याचा योग आला नव्हता.कारण या दरम्यानच्या काळात एकही वनडे मालिका नव्हती.त्यामुळे दोन्ही खेळाडूंना मोठा ब्रेक मिळाला होता. पण आता हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलिया सिरीजसाठी सज्ज झाले आहेत.
advertisement
मंगळवारी रोहित शर्मा आणि विराट कोहली दिल्लीला पोहोचले होते. त्यानंतर आज सकाळी हॉटेलमधून भारताची बस दिल्ली विमानतळासाठी रवाना झाली होती. पण बसमधून एकत्र प्रवास करण्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची खतरनाक भेट झाली. रोहित शर्मा हॉटेलमधून बाहेर पडताच समोर बस उभी होती. या बसमधून त्याला विराट कोहली सहज दिसला. यावेळी विराट दिसताचक्षणी रोहितने त्याला झूकून सलाम केला.त्यानंतर बसमध्ये जाऊन रोहितने विराट कोहलीची कडकडून मिठी मारून भेट घेतली. हा क्षण प्रत्येक भारतीय चाहत्यांसाठी खूप इमोशनल होता.
या भेटीसोबत टीम इंडियाचा वनडेचा कर्णधार शुभमन गिल आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माची देखील खास भेट झाली.रोहित शर्मा हॉटेल खाली उभा असताना शूभमन गिल त्याच्या पाठीला टच करतो आणि त्यानंतर रोहित वळताच दोघांची भेट होते.या सदर्भातला व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
वनडे मालिका
१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड
२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन