'आस्क मी एनीथिंग' सेशन
सोशल मीडियावरच्या 'आस्क मी एनीथिंग' सेशनमध्ये सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या. वीरेंद्र सेहवागने एक खुलासा केला होता. त्यामध्ये त्याने सांगितलं की, 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीला युवराजच्या वर खेळण्यासाठी पाठवणं हा सचिनचा निर्णय होता. हे खरं आहे का? आणि त्यामागचं कारण काय होतं? असा सवाल एका फॅनने विचारला. त्यावर सचिनने उत्तर दिलं.
advertisement
मुरलीधरन आणि CSK
या निर्णयामागे दोन कारणं होती. मैदानावर दोन्ही लेफ्ट हँड बॅटर असणं धोक्याचं होतं, ते पण दोन ऑफ स्पिनर्स समोर असताना. तसेच मुथय्या मुरलीधरन हा 2008 ते 2010 या काळात चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळला होता. धोनीने त्याच्यासोबत तीन सीझन नेट्समध्ये घालवली आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता, असं सचिन म्हणाला.
क्रेडिट घेतलं नाही
दरम्यान, सचिनने उत्तर तर दिलं पण स्वत:ला क्रेडिट घेतलं नाही. सचिनने दिलेल्या उत्तरावरून समजतंय की, हा निर्णय तर सचिनचाच होता. मात्र, सचिनने उत्तर देताना फक्त कारण सांगितलं आणि मी पणा दाखवला नाही. त्यामुळेच सचिन का ग्रेट आहे, याची प्रचिती मिळते.