मूळचे मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथील इलेव्हन चॅलेंज स्पोर्ट क्लबचा दिव्यांग क्रिकेटपटू साजिद तांबोळी याने आपल्या जिद्दीच्या जोरावर भारतीय दिव्यांग संघात स्थान मिळवले आहे. अनेक वर्षांच्या सरावानंतर मिळालेल्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबात आणि गावात आनंदाचे वातावरण आहे. झारखंडमधील रांची येथे 13 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत–नेपाळ टी-20 आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट मालिकेत साजिदला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली आहे.
advertisement
दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाने (DCCBI) कडून निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. साजीदची निवड भारत आणि नेपाळ यांच्यात 13 ते 15 डिसेंबरदरम्यान झारखंडमध्ये होणाऱ्या T-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी ऑलराऊंडर म्हणून झाली आहे. उजव्या हाताच्या पंजावर अपंगत्व असूनही साजीद यांनी कठोर सराव आणि राष्ट्रीय स्पर्धांमधील चमकदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाची ब्लू जर्सी मिळवली.





