Mosambi Price : कवडीमोल भाव! हवालदिल शेतकऱ्याने परिपक्व मोसंबी फळासह काढली 278 झाडे, लाखोंचं नुकसान Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
जालन्याच्या मोसंबीची देशभर ओळख झाली. मोसंबीला भौगोलिक मानांकन देखील मिळालं. परंतु, मागील काही वर्षांत मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे शुक्लकाष्ठ काही संपायचं नाव घेत नाहीये.
जालना : मराठवाडा हा तसा दुष्काळी प्रदेश. सोयाबीन, कापूस, तूर ही पिके इथे प्रामुख्याने घेतली जातात. गोदावरीच्या खोऱ्यामध्ये मोसंबीचे पीक मोठ्या प्रमाणात मागील काही वर्षांत घेतलं जात आहे. पैठण आणि अंबड, घनसावंगी सारखे तालुके तर मोसंबीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाऊ लागले. जालन्याच्या मोसंबीची देशभर ओळख झाली. मोसंबीला भौगोलिक मानांकन देखील मिळालं. परंतु, मागील काही वर्षांत मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे शुक्लकाष्ठ काही संपायचं नाव घेत नाहीये.
मागील काही वर्षांत मराठवाड्यात पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा अधिक होत आहे. यामुळे मोसंबीला फळगळ आणि अन्य बुरशीजन्य रोगांचा प्रकोप दरवर्षीच होतोय. यामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळ होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होतंय. यंदा तर अनेक शेतकऱ्यांना विक्रीसाठी मोसंबी बागेतून काढताच आली नाही. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत देखील अनेक शेतकऱ्यांच्या बागांवर मोसंबी तशीच पडून आहे.
advertisement
या मोसंबीला थंडीच्या दिवसांमध्ये उत्तर भारतातून मागणी घटल्याने केवळ अडीच रुपये ते पाच रुपये प्रति किलो असा दर मिळतोय. यामुळे हवालदिल शेतकरी मोसंबीच्या बागेवर जेसीबी फिरवत आहेत. जालन्यातील दहिफळ येथील दिलीप काळे या शेतकऱ्याने आपल्या 278 मोसंबीच्या झाडांवर नुकताच जेसीबी फिरवला. त्यांच्या झाडावर मोसंबीची परिपक्व झालेली फळे तशीच शिल्लक आहेत.
advertisement
Success Story: नोकरी सोडली, बिझनेसने तारलं; 'खरात बंधू'नी आर्थिक अडचणींवर 'आईच्या चवीने' मिळवले विजय
मी 2014 मध्ये माझ्या अडीच एकर शेतात 278 मोसंबीच्या झाडांची 16/16 अंतरावर लागवड केली होती. 2019 च्या सुमारास माझ्या झाडांवर फळे लागण्यास सुरुवात झाली. 19, 20, 21 असे दोन-तीन लाख रुपये उत्पन्न दरवर्षी दिलं. मागील दोन-तीन वर्षांपासून मोसंबी फळगळ होत आहे. यंदा तर पावसाने मोसंबी बागेच्या बाहेर देखील काढू दिली नाही. त्यामुळे आतापर्यंत ती झाडावरच राहिली. बाजारात मोसंबीला भाव नसल्याचे माहीत असूनही मी 14 क्विंटल मोसंबी बाजारात नेऊन पाहिली.
advertisement
14 क्विंटल मोसंबीची केवळ पाच हजार रुपये लिलाव झाला. मोसंबी तोडण्याची मजुरी, बाजाराला नेण्याचे भाडे आणि आडत हमाली याचाच खर्च साडेपाच हजार झाला. मोसंबी तोडून बाजाराला नेण्याचा खर्च देखील वसूल न होता पाचशे रुपये मला खिशातून टाकावे लागले, त्यामुळे मी हे 278 झाड परिपक्व मोसंबीच्या फळांसह काढून टाकण्याचा निर्णय घेतला, असं दिलीप काळे यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
November 25, 2025 3:40 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Mosambi Price : कवडीमोल भाव! हवालदिल शेतकऱ्याने परिपक्व मोसंबी फळासह काढली 278 झाडे, लाखोंचं नुकसान Video

