TRENDING:

Sara Tendulkar: सारानं शुभमनसोबतचं नातं केलं ऑफिशिअल? 'त्या' ट्विटची रंगली चर्चा

Last Updated:

साराने एक ट्विट केलं ज्यामुळे दोघांचं नातं ऑफिशिअल झालं आहे असं म्हटलं जात आहे. खरंच साराने शुभमन गिलसाठी ट्वीट करत त्यांच्या नात्याबद्दल ऑफिशिअली सगळं सांगितलं आहे का?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 15 नोव्हेंबर : क्रिकेटर सचिन तेंडूलकरची लेक सारा तेंडूलकर मागील अनेक दिवसांपासून क्रिकेटर शुभमन गिलबरोबर रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. दोघांमध्ये नेमकं काय सुरू आहे हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता होती. आज भारत विरुद्ध न्यूझिलँड सामन्यादरम्यान सारानं सगळं ऑफिशिअली सांगून टाकलं आहे अशा चर्चा पाहायला मिळालं. या चर्चांचं कारण ठरलं ते म्हणजे साराचं एक ट्विट. साराने एक ट्विट केलं ज्यामुळे दोघांचं नातं ऑफिशिअल झालं आहे असं म्हटलं जात आहे. खरंच साराने शुभमन गिलसाठी ट्वीट करत त्यांच्या नात्याबद्दल ऑफिशिअली सगळं सांगितलं आहे का?
shubman gill - sara tendulkar
shubman gill - sara tendulkar
advertisement

आज ICC वर्ल्डकप 2023च्या पहिल्या सेमी फायनलचा भारत विरुद्ध न्यूझिलँड असा सामना आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर हा सामना रंगतोय. सारा तेंडूलकर देखील हा सामना पाहण्यासाठी वानखेडेवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे साराचं एक ट्वीट व्हायरल होत आहे ज्यात तिनं भारत विरुद्ध न्यूझिलँड सामन्यात भारतानं जिंकावं यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. इंडिया टीम जिंकेल असा विश्वास  व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे तिनं शुभमन गिलला उत्कृष्ट बॉलिंगसाठी शुभेच्छा दिल्यात. महत्त्वाचं म्हणजे सारानं पहिल्यांदा शुभमन गिलचा फोटो शेअर केला आहे.

advertisement

हेही वाचा - IND vs NZ Semi Final : अर्धशतकाच्या उंबरठयावर रोहित शर्माची विकेट, एक चूक पडली महागात

सारानं केलेल्या ट्विटमध्ये तिनं म्हटलंय, "Match Day. Hope IND wins. Play well My Man #ShubmanGill". सारानं या पोस्टबरोबर ब्लू हार्ट इमोजी आणि इंडियाचा फ्लॉग इमोजी देखील शेअर केला आहे. सारानं शुभमन गिलसाठी लिहिलेल्या Play well My Man या वाक्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. साराचं हे ट्वीट पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला पण हे ट्वीट ज्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलं ते सारा तेंडुलकरचं ऑफिशिअल अकाऊंट नाहीये. सारा तेंडूलकरच्या Parody अकाऊंटवरून हे ट्वीट करण्यात आलं आहे.

advertisement

मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर भारत विरुद्ध न्यूझिलँड असा सामना सुरू आहे. स्टेडिअमवर पोहोचलेली सारा टीम इंडियाला चिअरअप करताना दिसतेय.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sara Tendulkar: सारानं शुभमनसोबतचं नातं केलं ऑफिशिअल? 'त्या' ट्विटची रंगली चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल